November 26, 2025
श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय निंबुत येथे संविधान दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात मंगळवार दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले सकाळी ठीक १०.३० वा. प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना घोषणा फलक देण्यात आले होते त्यावर संविधानाविषयी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या प्रभात फेरी संपूर्ण […]
बारामती ! संविधान दिनानिमित्त होळ आठफाटा येथील शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप .
प्रतिनिधी – २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त होळ आठफाटा ग्रामपंचायत व परिसरातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे आयोजन होळ गावचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच सुरज कांबळे यांच्यावतीने करण्यात आले होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. याप्रसंगी होळ […]
सोमेश्वर विद्यालयात संविधान दिन साजरा
सोमेश्वरनगर ( वा ), श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर विद्यालय आंबी बुद्रुक येथे संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी गावातून ढोल ताशाच्या गजरात संविधान रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी यावेळी आपला अभिमान आपले संविधान अशा घोषणा देत जनजागृती केली. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबी बुद्रुकचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात […]
ग्रामपंचायत निंबूत येथे संविधान दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी. ग्रामपंचायत नींबूत येथे आज सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी नींबूत ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे यांनी संविधानाचे महत्त्व संविधानामुळे मिळालेले अधिकार याबाबत माहिती लोकांना दिले. या […]
परवानगीशिवाय डिजिटल प्रचार; गुप्त जाहीरात–व्यवहार व WhatsApp प्रचारावर आयोगाचा कडक इशारा
प्रतिनिधी नगरपरिषद/नगरपालिका निवडणूक 2025 संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना सरळ आणि कडक शब्दांत इशारा दिला आहे की, परवानगीशिवाय डिजिटल, सोशल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर चालणारा कोणताही प्रचार हा सरळसरळ गुन्हा मानला जाईल आणि अशा प्रकारांची दखल घेतल्यास उमेदवारांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. आयोगाने स्पष्ट केले आहे की रील्स, व्हिडिओ, ग्राफिक्स, बूस्टेड पोस्ट, पेड प्रमोशन, डिजिटल न्यूज […]
