Home

1 min read

शाळेतील शिक्षिकांकडून मारहाण अन् नववीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

प्रतिनिधी अकोला शहरातील नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला. शिक्षिकांकडून मारहाण आणि मानसिक जाचाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.शहरातील खदान परिसरातील रहिवासी अल्तमेश हा एका विद्यालयात नववीमध्ये शिक्षण घेत होता. काल शाळेत झालेल्या किरकोळ कारणांवरून अल्तमेशला शाळेतील शिक्षिकांनी बेदम मारहाण केली. त्याला शाळेतून काढून […]

1 min read

आरोग्य केंद्राच्या शिपायाचा पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पीडितेची उपचाराअभावी हेळसांड

प्रतिनिधी घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी ही घृणास्पद घटना घडली. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेची उपचाराअभावी हेळसांड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. ९ मार्चला […]

1 min read

शहरात कारवाईची अफवा पसरवणाऱ्या १२०० जणांवर गुन्हा

प्रतिनिधी कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्ग्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध १२०० जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छोटा शेख सल्ला दर्ग्यावर कारवाई करून तो पाडण्यात येणार असल्याची अफवा शुक्रवारी रात्री पसरविण्यात आली. त्यानंतर चार ते पाच हजार जण या परिसरात जमले. समाजमाध्यमातून अफवा पसरल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यामुळे या […]

1 min read

वर्गातील भांडणातून दहावीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

प्रतिनिधी वर्गात झालेल्या भांडणातून दहावीची परीक्षा देऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्याला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका विद्यार्थ्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार विद्यार्थी आणि त्याचा मित्र दहावीची परीक्षा देऊन दोन दिवसांपूर्वी आंबेगाव बुद्रुक स्मशानभूमी परिसरातील पीएमपी बस थांब्यावर विद्यार्थी आणि […]

1 min read

रत्नागिरी ! राजापूर तालुक्यातील रिफायनरी समर्थकांची बैठक संपन्न.

प्रतिनिधी – प्रकल्पाच्या माध्यमातून नाणार आणि बारसू या दोन्ही भागाचा प्रकल्पाच्या माध्यमातून विकास करण्यात यावा. २० एम.एम.टी.पी.ए .एवढा संकुचित न करता ६० एम. एम.टी.पी. ए. एवढा पूर्ण क्षमतेचा प्रकल्प नाणार आणि बारसू धोपेश्र्वर परिसरात राबवण्यात यावा. नाणार – बारसू रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समिती या बॅनर खाली एकत्र लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. राजापूर तालुक्यातील […]

1 min read

चोरीच्या वाहनासह पळवलेल्या मुलीचा शोध, दहा वर्षांनंतर मुलगी पालकांच्या स्वाधीन

प्रतिनिधी चोरीच्या वाहनाचा शोध घेत असताना संशयित वाहनासह सापडला खरा पण, त्याच्या बरोबर एक अल्पवयीन मुलगीही. ती कोण, कुठली याची चौकशी केली असता त्या मुलीलाही १० वर्षांपूर्वी पळवून आणून संशयिताने स्वत:बरोबर ठेवले होते. पोलिसांनी तपास करुन तिला मूळ पालकांच्या ताब्यात दिले. एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे कथानक साक्री येथील एका मुलीच्या बाबतीत घडले. पुण्याच्या शिरूर […]

1 min read

चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताची पोलीस कोठडीत आत्महत्या

प्रतिनिधी चोरीच्या गुन्ह्यात जळगाव जिल्ह्यातील मारवड येथील पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताने अमळनेर येथील पोलीस ठाण्यातील कोठडीत (लॉकअप) गळफास घेतल्याचे शनिवारी उघड झाले. अमळनेर तालुक्यातील मारवड येथील पोलीस ठाण्यात २५ फेब्रुवारी रोजी बकरी चोरीच्या दाखल गुन्ह्यात पोलिसांनी संशयित घनश्याम कुमावत (४९, मूळ रा. दोंदवाडे, चोपडा, हल्ली मुक्काम डांगरी, अमळनेर) याला दोन मार्च रोजी अटक केली होती. […]

1 min read

पोलिसांच्या वाहनातून पळालेल्या दोन आरोपींना सुरतमध्ये अटक

प्रतिनिधी भर रस्त्यात पोलिसांच्या गाडीतून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना सुरत येथून अटक करण्यात नवघर पोलिसांना यश आले. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्ह्या दाखल आहे. दरम्यान, सुरत पोलिसांच्या मदतीमुळे या दोन्ही आरोपींना अटक करणे शक्य झाले. मोईन यामीन कुरेशी (२३) आणि शाहीद अली शहा (१९) अशी या आरोपींची नावे […]

1 min read

समलैंगिक असताना लपवून विवाह; महिलेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

प्रतिनिधी मुलगा समलैंगिक असल्याचे लपवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी नवविवाहित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पती, सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रारदार तरुणी वडगाव शेरी परिसरात वास्तव्याला आहे. जुलै २०२२ रोजी तरुणीचा एकाशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती समलैंगिक असल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने सासू-सासऱ्यांकडे विचारणा केली. तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ […]

1 min read

एकतर्फी प्रेमातून महिलेसह सासूवर हल्ला; हल्लेखोर तरुण पसार

प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून एकाने महिला आणि तिच्या सासूवर हल्ला केल्याची घटना कोंढवा भागात घडली. पसार झालेल्या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीने महिलेच्या सासूच्या डोक्यात सिलिंडर मारल्याने दुखापत झाली. याप्रकरणी भीमाशंकर (पूर्ण नाव समजलेले नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला एका खासगी रुग्णालयात […]