Home

1 min read

कल्याणमध्ये क्रिकेट खेळण्यावरून विद्यार्थ्याला मारहाण

प्रतिनिधी क्रिकेट स्पर्धा महाविद्यालयाच्या आहेत. आरोपी हा महाविद्यालयात विद्यार्थी नसताना, तो दुसऱ्या गटाकडून का क्रिकेट खेळत आहे, असा प्रश्न एका तरूणाने उपस्थित केला. या वादातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बनावट महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून खेळणाऱ्या तरुणाने बेदम मारहाण केली. गेल्या महिन्यात हा प्रकार कल्याण मधील सुभाष मैदानात घडला होता. तक्रारदार विद्यार्थी रुग्णालयात उपचार घेत असल्याने तक्रारदार दाखल करण्यास उशीर […]

1 min read

धक्कादायक! युवकाने भररस्‍त्‍यात स्‍वत:ला पेटवून घेतले…

प्रतिनिधी अमरावती शहरातील वर्दळीच्‍या एका चौकात एक युवक हाती एक बाटली घेऊन येतो. काहीही न बोलता शांतपणे अंगावर पेट्रोल ओतून घेतो. लोकांना काही कळण्‍याआधीच तो स्‍वत:ला पेटवून घेतो. क्षणात तो होरपळून जातो. लोक त्‍याचा जीव वाचविण्‍यासाठी धावतात. अंगावर पाणी शिंपडतात. पोलिसांना पाचारण केले जाते. हा थरारक प्रसंग येथील पंचवटी चौकात सोमवारी दुपारी घडला. प्रवीण रामराव […]

1 min read

शाळकरी मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, पोलिसांकडून सुखरूप सुटका; अपहरण करणाऱ्यांचा शोध सुरू

प्रतिनिधी भारती विद्यापीठ परिसरामधून एका शाळकरी मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने तपास करून मुलाची सुटका केली. अपहरणकर्ते पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दहा वर्षांच्या मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. याबाबत त्याच्या पालकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली […]

1 min read

लाच प्रकरणात पिंपरीतील सहायक पोलीस आयुक्त अडचणीत, गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाखांची मागणी

प्रतिनिधी फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरून एक लाखांची लाच घेणाऱ्या मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मुगुटलाल पाटील यांची याप्रकरणात एसीबीकडून चौकशी करण्यात येणार आहे. ओंकार भरत जाधव (वय ३१, रा. वास्तुव्हिवा सोसायटी, वाकड, मूळ रा. अकोले, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे […]

1 min read

एकतर्फी प्रेमाची अशीही तऱ्हा! प्रेमवीराचा तरुणीच्या दुचाकीला ‘जीपीएस’ लावून पाठलाग

प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला जीपीएस यंत्र लावून तिचा पाठलाग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बारामतीतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लखन महादेव भिसे (वय २५ रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. या बाबत एका तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली […]

1 min read

वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु

प्रतिनिधी अपमानास्पद वागणूक दिल्याने वाघोली पोलीस चौकीच्या आवारात पेटवून घेणाऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यु झाला. रोहिदास अशोक जाधव (वय ३२, रा. वाघोली) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. वाघोली पोलीस चौकीसमोर ही घटना १३ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यात जाधव गंभीर भाजले होते. जाधव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. या प्रकरणी अतिरिक्त […]

1 min read

सोमवार पेठेतील गुंडाकडून साडेतीन कोटीचे मेफेड्रोन जप्त; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

प्रतिनिधी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. या प्रकरणी सोमवार पेठेतील गुंड वैभव उर्फ पिंट्या माने याच्यासह तिघांना अटक करण्यात आली असून, अमली पदार्थ तस्करीमागे आंतरराष्ट्रीय तस्कर असल्याचा संशय आहे. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि साथीदारांकडून ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले […]

1 min read

पुण्यात पार्किंगच्या वादातून महिलेला जाळून टाकण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी पुण्यातील खराडी भागातील तुकारामनगर भागात पार्किंगच्या वादातून महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी धीरज सपाटे (वय २५) हा पसार झाला आहे. आकाश सोदे (वय २३),नयत गायकवाड (वय १९), सूरज बोरुडे (वय २३), विशाल ससाने (वय २०) या चार आरोपींना […]

1 min read

अमरावती-यवतमाळ मार्गावर भीषण अपघातात चार ठार, १० जखमी

प्रतिनिधी यवतमाळ मार्गावर नांदगाव खंडेश्‍वर नजीक शिंगणापूर येथे सिमेंट कॉंक्रिट मिक्‍सर ट्रकने टेम्‍पो ट्रॅव्‍हलरला धडक दिल्‍याने झालेल्‍या भीषण अपघातात चार तरूणांचा जागीच मृत्‍यू झाला, तर १० जण गंभीररीत्‍या जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी घडला. जखमींवर येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय आणि खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व तरूण अमरावतीहून यवतमाळ येथे एका क्रिकेट स्‍पर्धेत […]

1 min read

इंस्टाग्रामवर ओळखी झाली, मग प्रेम झालं… दहावीच्या विद्यार्थिनीसोबत नंतर काय घडलं?

प्रतिनिधी इंस्टाग्रामवरून एका युवकाशी ओळख झाल्यानंतर दहावीतील मुलीचे सूत जुळले. घरात कुणी नसताना त्यांनी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली. मुलीचे पोटाचा आकार वाढल्याने आईच्या लक्षात प्रकार आला. तिने मित्राचे नाव सांगितल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. शिवम शेषराम मेहरा (१९,एकतानगर, भांडेभाडी) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी दहाव्या […]