Home

1 min read

तलाठी भरतीतील दोन हजार उमेदवारांचे भवितव्य अधांतरी

प्रतिनिधी राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील २३ जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षायादी २३ जानेवारीला रात्री उशीरा भूमी अभिलेख विभागाने जाहीर केली. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया चालू आठवड्यापर्यंत पूर्ण होऊन संबंधित उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. मात्र, उर्वरित आदिवासीबहुल १३ जिल्ह्यांमधील निवड […]

1 min read

कोल्हापुरात सराफांना दणका; बंगाली कारागिराने दीड किलो सोने लांबवले

प्रतिनिधी कोल्हापूर येथील सराफ व्यावसायिकांचे सुमारे पाऊण कोटी रुपये किंमतीचे दीड किलो सोने घेऊन बंगाली कारागीराने अन्य साथीदारांसह गुरुवारी पलायन केले. काशिनाथ बंगाली असे त्याचे नाव आहे. या घटनेने सराफ बाजारात खळबळ उडाली आहे. काशिनाथ बंगाली हा सोने कारागीर गेली पंधरा वर्षे गुजरी परिसरातील महादेव गल्लीत राहत होता. कोल्हापुरातील अनेक सराफ पेढ्यांचे दागिने बनवण्याचे तो […]

1 min read

नागपुरात १२ दिवसांत १० खून; कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर

प्रतिनिधी मित्राच्या प्रेम प्रकरणाचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवकावर तीन आरोपींनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली. ही घटना पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी १२ फेब्रुवारीला रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. अभिषेक उर्फ भांजा संजय गुलाबे (२३, […]

1 min read

तरुणीच्या प्रेमासाठी प्रियकर बनला तोतया सैन्यअधिकारी, डाव्या हाताने ‘सॅल्यूट’ केला

प्रतिनिधी तरुणीच्या प्रेमात वेडा झालेल्या तरुणाने तिचे प्रेम मिळविण्यासाठी तोतया सैन्य अधिकारी बनला. तिला ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भेटायला गेला. मात्र, तेथे एका वरिष्ठ अधिकाऱ्याला डाव्या हाताने ‘सॅल्यूट’ केल्यामुळे तो चौकशीच्या जाळ्यात अडकला. त्याला वाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. परंतु, त्या युवकाच्या कृतीमुळे ऑर्डनन्स फॅक्टरी परीसरातील सुरक्षा यंत्रणा पुरती हादरली होती. अभिजीत अनिल चौधरी (रा. प्लॉट क्रमांक […]

1 min read

माजी क्रिकेटपटू केदार भावे यांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरला

प्रतिनिधी माजी क्रिकेटपटू केदार भावे यांचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सारसबाग परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत केदार श्रीराम भावे (वय ६४, रा. सुभाषनगर, शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भावे ६ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सारसबाग परिसरातील सणस मैदान परिसरातून […]

1 min read

जुन्या वाहनांना आता नवीन नंबर प्लेट बंधनकारक! लवकरच अंमलबजावणी सुरु होणार

प्रतिनिधी देशभरात एप्रिल २०१९ नंतर नवीन वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) बंधनकारक करण्यात आल्या. त्यानंतर केंद्र सरकारने जुन्या वाहनांनाही या क्रमांक पाट्या बंधनकारक केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्य सरकारला याबाबत प्रस्ताव पाठविला असून, लवकरच त्यावर निर्णय अपेक्षित आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने […]

1 min read

पिंपरीत धावत्या गाडीच्या टपावर बसून तरुणाची स्टंटबाजी; तरुणाचा पोलीस घेत आहेत शोध!

प्रतिनिधी पिंपरी- चिंचवडमधील एक स्टंटबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून हा तरुण स्टंटबाजी करताना व्हिडीओमध्ये दिसतो आहे. या तरुणाचा शोध वाहतूक पोलीस घेत असून त्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. […]

1 min read

पिंपरीत विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पोलिसांनी घेतली पाच लाखांची खंडणी

प्रतिनिधी महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून कारागृहात घालण्याची धमकी देत पाच लाख रुपये उकळणा-या देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.   याप्रकरणी अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा यांना अटक केली आहे. तर, पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळसह […]

1 min read

साहित्य सम्राटला क्रांतीगुरू लहुजी वस्ताद राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त

प्रतिनिधी मातंग साहित्य परिषदे तर्फे मातंगऋषी दुसरे साहित्य संमेलन, राजवाडा लॉन्स पिंपरी चिंचवड पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, स्वागताध्यक्ष शंकरशेठ जगताप, आमदार सुनिल कांबळे, परिषदेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय भिसे आदी मान्यवरांच्या हस्ते साहित्य सम्राट पुणे बहुउद्देशिय संस्थेस क्रांतीगुरू लहुजी साळवे वस्ताद उत्कृष्ट राज्यस्तरीय संस्था पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष […]

1 min read

प्रेमदिनी प्रेयसीसाठी सांडले रक्त…मित्राला संपवून तो स्वत:च पोहोचला पोलीस ठाण्यात…

प्रतिनिधी जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’साजरा होत असताना उपराजधानीत मात्र प्रेयसीच्या प्रेमावर संशय घेत मित्राचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही थरारक घटना बुधवारी सकाळी ११ वाजता मानेवाडा चौकाजवळ नाईकनगरात घडली. सूरज ऊर्फ बिहारी अमिर महतो (२५, रा.बालाजीनगर. मानेवाडा रोड) असे मृत युवकाचे तर विपीनकुमार गुप्ता (२५, नाईकनगर) असे आरोपीचे नाव आहे. हत्याकांडानंतर आरोपी स्वत:हून अजनी […]