Home
पुण्यातील तरुणाचा अनैतिक संबंधातून गुवाहाटीत खून, महिलेसह दोघांना अटक
प्रतिनिधी पुण्यातील तरुणाचा आसाममधील गुवाहाटी शहरात खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक केली आहे. अनैतिक संबंधातून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संदीप सुरेश कांबळे (वय ४४, रा. येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंजली शाॅ, विकासकुमार शाॅ यांना अटक करण्यात आली आहे. संदीप याचा गुवाहाटी […]
आमदार रोहित पवारांच्या माजी अंगरक्षकाचा भररस्त्यात पिस्तूल काढून राडा
प्रतिनिधी कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या माजी अंगरक्षकाने किरकोळ कारणावरून पिस्तूल काढून राडा घातल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. सुरक्षारक्षकाकडे शस्त्र परवाना असून, त्याच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि सात काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी प्रताप धर्मा टक्के (वय ३९, रा.कात्रज) याच्याविरुद्ध बुधवारी रात्री उशीरा हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत […]
बारामती शहरातून गायब झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा बारामती शहर पोलीसांनी तात्काळ लावला शोध
प्रतिनिधी काल दिनांक ०७.०२.२०२४ रोजी सकाळी १०.०० बा सुमारास वारामती शहरातील शाहू हायस्कूल मध्ये शिकणा-या चार अल्पवयीन मुली १३ ते १५ वर्षे वयाच्या हया घरी आल्या नाहीत म्हणुन त्यांचे पालकांनी रात्री ९.०० वा बारामती शहर पोलीस स्टेशन येथे येवून चारही अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले अशी माहीती देताच पोलीसांनी सदर गुन्हयाचे […]
शेतकरी कृती समितीच्या आंदोलनाची दखल घेत राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचे सोमेश्वर च्या कारभाऱ्यांना सभासदांच्या ऊस तोडीस प्राधान्य देण्याचे आदेश.?
संपादक मधुकर बनसोडे. मागील दोन दिवसांपूर्वी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश राव काकडे यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ती सभासदांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये प्रामुख्याने गेट-किन बंद करून सभासदांचा ऊस तोडीसाठी प्राधान्य द्यावे, कोणत्याही प्रकारे ऊस जळीत करून आणू नये, सभासदांकडून ऊस तोडी साठी ऊस मजुरांनी पैसे घेऊ नयेत अशा […]
दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून तरुणाची गोळ्या झाडून हत्या
प्रतिनिधी वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरुन देशी कट्ट्यातून गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास येथील कळंब चौक परिसरात घडली. यावेळी संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जाळली. शादाब खान रफीक खान (रा. तायडे नगर) असे मृताचे नाव आहे. मनीष सागर शेंद्रे (रा. सेजल रेसिडेन्सी, अंबिका नगर यवतमाळ) असे आरोपीचे नाव […]
दोन कोटींच्या गांजासह तस्कराला अटक
प्रतिनिधी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्यास ट्रकसह पकडले. ही कारवाई बोरखेडी टोलनाक्यावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली. झडतीत ट्रकमधून एक कोटी ९५ लाख १० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. शंकर (४५) रा. विशाखापट्टनम असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. विशेष म्हणजे […]
शहरातील मध्यवर्ती गणेशपेठ बस स्थानकातील बसमध्ये आढळला बॉम्ब
प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती गणेशपेठ बस स्थानकातील अहेरी आगाराच्या बसमध्ये बुधवारी दुपारी १ च्या सुमारास “टिफिन बॉम्ब” आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही बस तीन दिवसांपासून याच आगारात उभी होती. काल ती सावनेरला जाऊन आल्याची माहिती आहे. ही माहिती कळताच गणेशपेठ पोलिसांचा ताफा आणि बीसीडीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली. याशिवाय दहशतवादी विरोधी पथकही दाखल झाले तसेच […]
मोबाईल दिला नाही म्हणून घरात घुसून मैत्रिणीवर कोयत्याने वार
प्रतिनिधी मोबाईल दिला नाही म्हणून मित्रानेच घरात घूसुन मैत्रिणीवर कोयत्याने वार केल्याची घटना काळेवाडी येथे सोमवारी दुपारी घडली. अविनाश शिवाजी लोखंडे (वय ३०, रा. गुळवे वस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरूणी तिच्या मावस बहिणीच्या घरी असताना आरोपी घरात घुसला. फिर्यादी मोबाईलवर बोलत असताना आरोपीने कोणाशी […]
पोलीस भरतीला आला आणि पाच वर्षांसाठी तुरुंगात गेला
प्रतिनिधी लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवारास न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सागर लालसिंग राठोड (वय ३१, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे शिक्षा सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत राठोड याने बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. याप्रकरणी खडकी […]
मुगटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश राव काकडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर.
प्रतिनिधी. विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील सुप्रतिष्ठित व्यक्तींनी केलेल्या योगदानाचा गौरव व्हावा या उद्देशाने दरवर्षी जीवनसाधना गौरव पुरस्कार विद्यापीठामार्फत दिला जातो. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ उल्लेखनीय योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सालाबाद प्रमाणे जीवन साधना गौरव पुरस्कार प्रदान करत असते. हा मानाचा समाजाला जाणारा पुरस्कार यंदाच्या अमृत महोत्सवी वर्षातील वर्धापनाच्या दिवशी सन्मानित करण्यात […]