संपादक मधुकर बनसोडे.
मागील दोन दिवसांपूर्वी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश राव काकडे यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ती सभासदांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चामध्ये प्रामुख्याने गेट-किन बंद करून सभासदांचा ऊस तोडीसाठी प्राधान्य द्यावे, कोणत्याही प्रकारे ऊस जळीत करून आणू नये, सभासदांकडून ऊस तोडी साठी ऊस मजुरांनी पैसे घेऊ नयेत अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र विद्यमान चेअरमन यांनी मासिक मीटिंगमध्ये निर्णय घेऊन कळवतो असे सांगितल्यानंतर सर्व सभासदांनी दहा तारखेला काटा बंद करू असे शेतकरी कृती समितीस सांगितले. त्यानंतर शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष यांनी सर्व प्रकार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कानावरती आपण घालणार आहोत व वेळ पडली तर दहा तारखेला शेतकरी कृती समितीच्या वतीने काटा बंद आंदोलन करू असे अश्वस्थ केले होते.
आज मिळालेल्या खात्रीलायक सूत्रांच्या माहिती वरून शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्री सतीश राव काकडे, व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांची भेट झाल्यानंतर सोमेश्वरच्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांवरती झालेल्या अन्यायवर्ती चर्चा झाली त्यामध्ये लगेचच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चेअरमन व कार्यकारी संचालक यांना भ्रमणध्वनी द्वारे सोमेश्वर च्या सभासदांवरती कोणताही अन्याय होणार नाही सोमेश्वरच्या ऊस उत्पादक सभासदास तोडीसाठी प्रथम प्राधान्य देण्यात यावे? असे आदेश दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजत आहे.
दोन दिवसांमध्ये पूर्ण गेट-किन बंद करण्याचे आदेश चेअरमन व कार्यकारी संचालक यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजत आहे.?