बारामती शहरातून गायब झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा बारामती शहर पोलीसांनी तात्काळ लावला शोध

क्राईम

प्रतिनिधी

काल दिनांक ०७.०२.२०२४ रोजी सकाळी १०.०० बा सुमारास वारामती शहरातील शाहू हायस्कूल मध्ये शिकणा-या चार अल्पवयीन मुली १३ ते १५ वर्षे वयाच्या हया घरी आल्या नाहीत म्हणुन त्यांचे पालकांनी रात्री ९.०० वा बारामती शहर पोलीस स्टेशन येथे येवून चारही अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले अशी माहीती देताच पोलीसांनी सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवून लागलीच तपास सुरू करून चारामती पोलीसांनी तांत्रीक विश्लेषणाचे आधारे सदर मुलींची माहीती घेवून सदरच्या मुली पुणे स्टेशन परिसरात आहेत अशी तांत्रीक दुष्ट्या माहीती मिळवुन पुणे शहर बंडगार्डन पोलीसांशी संपर्क केला व बंडगार्डन पोलीसांनी एक तासात म्हणजे १०.०० वा सदर मुलींना ताब्यात घेतले व लागलीच वारामती पोलीसांनी त्या चारही मुलींना वारामती येथे सुखरूप आणले व त्या मुलींना पालकांचे ताब्यात दिलेले असून त्यायावत पालकांनी पोलीसांचे आभार मानलेले आहेत.

सदर कार्यवाही मध्ये मा. श्री पंकज देशमुख साो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मा. श्री संजय जाधव साो, अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री श्रीकांत पाडूळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व अमंलदार श्रीकांत गोसावी, बापू इंगोले यांनी सदरची चांगली कामगीरी केलेली आहे.