Home
राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम – पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे
प्रतिनिधी नीरा ता.पुरंदर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचा वर्धापनदिन आणि राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.याबाबतची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या पक्षाचे पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी दिली. गुरूवार दिनांक २७ जुलै […]
आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
प्रतिनिधी घरांचे व शेतीच्या पिकांचे नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची कार्यवाही करा संपर्क तुटण्याची शक्यता असलेल्या गावांची यादी अद्ययावत करा,यंत्रणेने समन्वयातून आरोग्य शिबिरे व औषध साठा उपलब्ध ठेवावा आढावा बैठकीत नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे दिले निर्देश अतिवृष्टीमुळे शहरातील वस्त्यांमध्ये तसेच नदीच्या काठावरील गावांमध्ये पाणी शिरते. यामध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. याशिवाय जीवितहानी होऊन […]
सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मोरगाव येथे २० हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा शुभारंभ
प्रतिनिधी ‘पर्यावरणाप्रती कृतज्ञता-वृक्षारोपण व संवर्धन’ या अभियानाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्यावतीने बारामती तालुक्यातील मोरगाव येथे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या हस्ते २० हजारापेक्षा अधिक वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. सा. बां. (वैद्यकीय) उपविभाग बारामतीच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे आदी उपस्थित होते. […]
होलार समाजातील युवकांची होलार समाज यंग ब्रिगेड या संघटनेला सर्वाधिक पसंती….!
प्रतिनिधी राज्यभरातील नांदेड, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील तरुणांनी केली सदस्य नोंदणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब नामदास यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे कार्य तसेच दादासाहेब संघटनेमध्ये तरुणांना देत असलेले प्राधान्य पाहून त्यांच्या नेतृत्वाखाली होलार समाजाचे युवा नेते सेवक भाऊ अहिवळे (बारामती), हनुमंत दादा केंगार (वालचंदनगर), आण्णासाहेब जहीरे (नांदेड), महेंद्र गोरे (फलटण) अनिल केंगार (वालचंदनगर), सचिन हेगडे […]
वडगाव निंबाळकर चे पोलीस लयच भारी न लाजता केले हे काम नागरिकांमधून कौतुकाची थाप
प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी. वडगाव निंबाळकर पोलिसांचे कौतुक करावे तेवढे कमीच कारण की वडगाव निंबाळकर पोलीस प्रशासन हे प्रत्येक चांगल्या गोष्टीला सहकार्य असो किंवा कुठल्या प्रकारची मदत असो वडगाव निंबाळकर पोलिस प्रशासन आशा कामासाठी धावून जात असते . त्यामध्ये ते पाहत नाही की हा गरीब आहे की श्रीमंत […]
करंजे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
प्रतिनिधी मा.श्री अजितदादा पवारसो उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर सेवाभावी संस्था, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट, व सोमेश्वर पंचक्रोशीतील कार्यकर्ते यांचे वतीने सोमेश्वर देवस्थान करंजे येथे अभिषेक व केक कापून साजरा करण्यात आला. या प्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन मा.श्री पुरूषोत्तमदादा जगताप, प्रमोदकाका काकङे सभापती बांधकाम व आरोग्य पुणे, उधोजक संतोषराव कोंढाळकर सोमेश्वर संचालक संग्रामभाऊ सोरटे यांच्या […]
शाळेत जावे तरी कसे, दररोज पाण्यातून वाट काढावी लागते….
प्रतिनिधी वाशिम जिल्ह्यातील तिवळी येथील जिल्हा परिषद शाळेत पावसाळ्यात शाळेच्या संपूर्ण आवारात पावसाचे पाणी नेहमीच साचले जाते त्याच पाण्यातून सर्व विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सरपंच, सचिव, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी याबाबत दखल घ्यावी. दररोज विद्यार्थ्यांना पाण्यातून शाळेत जावे लागते. संपूर्ण जिल्हा परिषद शाळेच्या […]
रक्तदान शिबीरामध्ये १७१ रक्त बाटल्यांचे संकलन
प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रक्तदान शिबीरामध्ये १७१ रक्त बाटल्या संकलन झाले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते उर्फ नाना पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबीरांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नेत्रचिकित्साशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. विवेक सहस्त्रबुद्धे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल शिंदे, शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. […]
अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत केला वाढदिवस साजरा.
प्रतिनिधी करंजेपूल गावचे हिंदवी उधोग समूहाचे सर्वेसर्वा मा.श्री राजेंद्र गायकवाङ यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. जि.प.प्राथमिक शाळा करंजेपूल येथे वृक्षारोपण तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांना शालेय साहित्य वही पेन खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. या प्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेतील विध्यार्थी व शाळेच्या अङचणी जानून घेतल्या.शाळेच्या […]
राज्यात २२ ते २४ जुलै दरम्यान अतिवृष्टीची शक्यता
प्रतिनिधी नागपूर : उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओडीशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पाऊस पडत असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. आज नाशिक, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, नागपूर , वर्धा अकोला, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर २२ ते २४ जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. भारतीय […]