Home

1 min read

अखिल भारतीय राजभाषा परिषद यशस्वी करण्यासाठी नियोजन करावे-विभागीय आयुक्त सौरभ राव

प्रतिनिधी             हिंदी राजभाषा दिवस-२०२३ आणि अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे आयोजन करण्याचा बहुमान जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाद्वारे योग्य नियोजन करुन परिषद यशस्वी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज दिले.             केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय राजभाषा विभागाच्यावतीने १४ आणि […]

1 min read

माळेगाव येथे पेरू शेतीशाळा संपन्न

प्रतिनिधी कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे अंतर्गत मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या (स्मार्ट) मूल्य साखळी विकास शाळेअंतर्गत प्रतिभा फार्मर प्रोडूसर कंपनी माळेगाव (बु)च्या सभासद शेतकऱ्यांसाठी आयोजित पेरू पिक शेतीशाळा संपन्न झाली. यावेळी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, प्रतिभा फार्मर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष अशोक […]

1 min read

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचे तालुका कृषि अधिकाऱ्यांचे आवाहन

प्रतिनिधी चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे. योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. खरीप हंगामातील बाजरी,भुईमूग, सोयाबीन, तूर व कांदा या अधिसूचित पिकांसाठी महसूल, मंडळ, क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. सन […]

1 min read

शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणीसाठी अतिरिक्त रक्कम देऊ नये-कृषि आयुक्त

प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कमेची मागणी होत असल्यास संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. शेतकऱ्यांना केवळ १ रुपया भरून https://pmfby.gov.in या पोर्टलवर पीक विमा योजनेतील सहभागाची नोंदणी करता येते. पीक […]

1 min read

पुणे ग्रामीण मध्ये २४१ गावांत स्वस्त धान्य दुकान परवाने देण्यात येणार

प्रतिनिधी  पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यात २४१ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे. बारामती आणि दौंड तालुक्यातील प्रत्येकी ३, मावळ – ३६, खेड- १०, आंबेगाव – १९, इंदापूर – ६, वेल्हे- ७०, […]

1 min read

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी  पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरामधील अन्नधान्य वितरण कार्यालयाअंतर्गत ११ परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात २५ रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.           रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://pune.gov.in वर […]

1 min read

’आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ अंतर्गत ११ लाखाहून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी 

प्रतिनिधी  आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर ६ लाख ६४ हजार ६०७ तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये ५, लाख ७७ अशा एकूण ११ लाख ६४ हजार ६८४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरवून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विक्रमी कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि आरोग्यमंत्री […]

1 min read

शेंडकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दिंडीचे आयोजन.

  प्रतिनिधी जि.प.प्राथमिक शाळा शेंङकरवाङी येथे विध्यार्थी बाल गोपाळांनी आज आषाढी वारी निमित्त टाळ मृदुंगाच्या स्वरात दिंङीचे आयोजन केले होते.जागोजागी महिला मंङळींनी औशन करून दिंङीचे स्वागत केले.शेंङकरवाङी मध्ये प्रदर्शिना घालून भक्तिमय वातावरण निर्माण केले.बालगोपाळांनी वारकरी मंङळीना साजेल आशी वेशभूषा केली होती.या वेळी संपूर्ण शेंङकरवाङी मध्ये महिलांनी रस्त्यावर रांगोळी काढली होती.या कार्यक्रमाचे आयोजन जि.प.शिक्षक सतिश पिसाळ, […]

1 min read

काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

प्रतिनिधी   सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ मध्ये इयत्ता अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव श्री सतीशराव लकडे, व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. महेंद्रसिंह जाधवराव व उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले […]

1 min read

जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास

प्रतिनिधी गेल्या वर्षभरात जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात आली आहे. विशेषत: पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. रस्ते, मेट्रो मार्ग, नदी सुधार प्रकल्प, शिक्षण, आरोग्य अशा विविध माध्यमातून शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: लक्ष घालून प्रशासनाला सूचना केल्या. […]