Home
वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण – मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
प्रतिनिधी पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह […]
निंबूत विद्यालयात योग दिन साजरा
प्रतिनिधि श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत विद्यालयात २१ जून २०२३ रोजी सकाळी ठीक ९:००वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला . आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी योग दिनाविषयी माहिती सांगितली, विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले .वाढत्या वयामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास होण्यासाठी योगासने अतिशय महत्त्वाची असतात , […]
देशात प्रथमच रेल्वे स्टेशनवर मोफत विधी सेवा व मध्यस्थी चिकीत्सालय स्थापन
प्रतिनिधी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्यावतीने जागतिक बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून पुणे रेल्वे स्टेशन येथे मोफत विधि सेवा व मध्यस्थी चिकीत्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. देशात प्रथमच या प्रकारचे चिकीत्सालय रेल्वे स्टेशनवर स्थापन करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन पुणे येथे […]
संत निरंकारी मिशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस वसुधैव कुटुम्बकमचा सिद्धांत वन वर्ल्ड वन हेल्थ विषयावर आयोजित
प्रतिनिधी संत निरंकारी मिशनच्या वतीने दिनांक २१ जून, २०२३ रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिनी’ मिशनच्या विविध शाखांमध्ये वसुधैव कुटुम्बकम चा सिद्धांत समोर ठेवत ‘वन वर्ल्ड, वन हेल्थ’ या विषयानुसार सकाळी ६:०० वाजता स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या जागांमध्ये तसेच उद्यानांमध्ये साजरा केला जाणार आहे. पुणे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या संत निरंकारी सत्संग भवन ,गंगाधाम सहित, संत निरंकारी […]
दिव्यांग विद्यार्थ्याना पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी नवीन अर्ज डिबीटी पोर्टलवर सादर करण्याची तसेच सन २०२१ – २२ या वर्षासाठी पुन्हा अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून असून जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांनी केले आहे.
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत अनुदानासाठी गोशाळांना अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी जिल्ह्यात सन २०२३ – २४ मध्ये सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यामधून एका गोशाळेस अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज व प्रस्ताव १९ जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत गोशाळेकडे सांभाळ करण्यात येत असणारे पशुधन विचारात घेवून एकरकमी १५ लक्ष ते २५ लक्ष […]
फलटण ! बी.आर.एस.ची फलटण तालुक्यातील गावागावांत जोरदार चर्चा .
प्रतिनिधी – फिरोज भालदार शेतकरी,कष्टकरी,विधीज्ञ,महिला,युवा-युवती यांच्या प्रवेशांची गावोगावी चर्चा. पार्टीचे किसान सेल चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम साहेब आणि बी .जी देशमुख साहेब पुणे विभाग नेतृत्वाखाली , महाराष्ट्र शिवशाही माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ समन्वयक व कामगार नेते गजानन (भाऊ) भगत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १६/०६/२०२३ रोजी फलटण शासकीय विश्रामगृह […]
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात प्रशासनाच्यावतीने स्वागत
प्रतिनिधि ‘हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ‘ अशा भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानोबा- माउली तुकाराम’ च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती तालुक्यात आगमन झाले. मौजे खराडेवाडी येथे प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले. यावेळी तहसिलदार […]
टाळ मृदुंगाच्या गजरात संत सोपान काका महाराज पालखीचे बारामती तालुक्यातील निंबुत येथे जंगी स्वागत.
संपादक मधुकर बनसोडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निंबूत येथे संत श्रेष्ठ श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीचे आज पाच वाजता आगमन झाले. यावेळी बा.सा. काकडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल लेझीम वाजवत पालखीचे स्वागत केले पालखीतील प्रत्येक विणेकऱ्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्यावतीने केळी, व चहा वाटप करण्यात आले. यावेळी […]
माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांची जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला
प्रतिनिधी सध्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे. सदर पालखी मार्गावर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी यांनी आज यवत पासून पालखी महामार्गाच्या सुरक्षेची पाहणी केली सुरक्षेबाबत वरिष्ठ अधिकारी व पोलीस घटकातील शेवटचा पोलीस अमलदर यांना समक्ष भेटून प्रत्येक पॉईंटवर सूचना दिल्या. प्रत्येक पालखी मुक्कामी व […]