प्रतिनिधी
भारतात प्रत्येक दिवशी हजारो रक्तदात्यांची गरज असते ही गरज लक्षात घेऊन अनेक संस्था निःस्वार्थ भावनेने या मानवीय कार्यामध्ये आपले योगदान देत असतात. अनेकांचे प्राण वाचवण्यात मोलाचे ठरणाऱ्या रक्ताची किंमत अमूल्य असते. असे हे श्रेष्ठदान सर्वाधिक संख्येने करून अनेकांचे प्राण वाचविण्यात योगदान दिल्याबद्दल प्रादेशिक रक्तपेढी ससून सर्वोपचार रुग्णालय व बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्या द्वारे १६ ऑक्टोबर २०२४, बुधवार रोजी पॅथोलोजी लेक्चर हॉल, बे.जी.शा.वै.म. कॉलेज बिल्डिंग, येथे संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन संस्थेचा सत्कार करण्यात आला.
१ ऑक्टोबर रोजी जागतिक स्वेच्छिक रक्तदान दिवस तसेच संपूर्ण रक्तदानमास निमित्त हा गौरव सोहळा संपन्न झाला. रुग्णालयामध्ये येत असणारे थॉयलेसिमिया,हिमोफिलिया चे रुग्ण, अपघात झालेले रुग्ण, गरोदर स्त्रिया या गरीब रुग्णांना रक्तपेढी विभागातून रक्तपुरवठा करण्यात येतो. अशा परिस्थिती मध्ये नियमित रक्तदाते, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, कॉलेज, कंपन्या, रोटरी क्लब, अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते रक्तपेढी विभागासाठी रक्तदान शिबिरे राबवून मोलाचे सहकार्य करीत असतात.
बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
या कार्यक्रमाला डॉ.अभिजित कुलकर्णी (संचालक, विद्यार्थी विकास मंडळ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर डॉ. एकनाथ पवार (अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे), संत निरंकारी मिशन चे पदाधिकारी तसेच ससून रुग्णालयाचे डॉक्टर आणि अन्य सामाजिक संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.