Home
शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सुलभपणे कर्ज द्यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी “शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील या दृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी नाबार्डच्या 2023-24 च्या स्टेट […]
कोविड- १९ व Influenza आजारांकरिता उपाययोजना व घ्यावयाच्या काळजीबाबत
प्रतिनिधी- कोमल काळे सदयस्थितीत महाराष्ट्र राज्यात वाढत असलेल्या Seasonal Influenza आजार आणि कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी व उपाययोजना राबविणेकामी मा. सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक सचिव- २ / कोविड-१९/३८४/२०२३ दि. ३१/३/२०२३ अन्वये आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करणेबाबत सूचित केलेले आहे. कॉविड- १९ व Influenza ची लक्षणे ही श्वसन […]
संजय गांधी निराधार योजनेची २५५ प्रकरणे मंजूर*
प्रतिनिधी बारामती,दि ३ : संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी प्रशासकीय भवन बारामती येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २५५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत एकूण २६७ अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी योजनेच्या १७७ प्राप्त अर्जापैकी १६९ मंजूर तर ८ अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे ७३ प्राप्त अर्जापैकी ६९ […]
३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त मावळ्यांची राष्ट्रीय शिवजागर यात्रा.
प्रतिनिधी. जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त मावळा जवान संघटनेच्या मावळ्यांच्या वतीने राष्ट्रीय शिवजागर यात्रा सुरू करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांना तोलामोलाची साथ देणाऱ्या वीर मावळ्यांचे वारसदार, शिवभक्त यात्रेत सहभागी झाले आहेत. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील राजमाता जिजाऊ समाधी स्थळावर नुकताच शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत हर […]
शिरवळ मधील रोहिणी साळुंखे यांनी हाताने बनवलेल्या दागिन्यांचे सिने क्षेत्रातील दिग्गजांनी केले कौतुक.
प्रतिनिधी शिरवळ मधील पोलीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान आलेल्या माधुरी पवार ,श्रेया बुगडे, भाऊ कदम यांना रोहिणी साळुंखे यांनी हाताने बनवलेले दागिने भेट केले. त्यावेळी या सर्वांनी दागिने बनवून भेट दिल्याबद्दल रोहिणी साळुंखे यांचे खूप कौतुक केले. माधुरी पवार यांनी कार्यक्रमा दरम्यान नाकात घातलेली अप्सरा नावाची विशेष नथ. या नथीचे खूप कौतुक झाले. ही नथ प्रमुख […]
रेशनिंग चा चोवीस पिशव्या तांदूळ जप्त
प्रतिनिधी काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या प्रत्येकी 50 किलो तांदळाच्या 24 बोऱ्या घेऊन जाणारा अशोक लेलँड टेम्पो क्रमांक एम हेच 42 बीएफ 1307 जात असताना सपोनी संकपाळ पोलीस हवालदार काळे पोलीस हवालदार ससाने पोलीस हवालदार खांडेकर पोलीस नाईक कोळेकर यांना नाकाबंदी दरम्यान मिळाला. सदर टेम्पो चालक गणेश मारुती दळवी राहणार डोरलेवाडी याने सदरचा तांदूळ त्याने खरेदी […]
प्लॉट देतो म्हणून दोन लाख 65 हजार रुपये ची सामान्य व्यक्तीची फसवणूक
प्रतिनिधी इसम नामे नवनाथ सोमनाथ माने हा मोलमजुरी करून आपली उपजीविका करतो बारामती शहरांमध्ये आपल्याला स्वतःला राहण्यासाठी जागा असावी म्हणून त्याने ऑल इंडिया मानवाधिकार संघटनेचे अमीन हंबीर शेख राहणार स्नेह कुंज अपार्टमेंट भिगवन रोड यांना चेक द्वारे ऑनलाईन व रोख स्वरूपात दोन लाख 65 हजार रुपये दोन गुंठे प्लॉट घेण्यासाठी दिले त्यांनी प्लॉटही दाखवला परंतु […]
पीडितेचे आरोपी सोबत चे फोटो व्हायरल करायची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग
प्रतिनिधी पीडित मुलगी व आरोपी सोहम भोई राहणार गुणवडी यांचे 2019 पासून सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली ओळख नंतर त्यांचे शरीर संबंध आले. आणि नंतर आरोपी त्याला वाटेल तेव्हा त्यांचे खाजगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवत होता 31 मार्च रोजी सदर पीडिता त्याच्याकडे गेली व त्याला लग्नाबाबत बोलली असता त्याला […]
बारामती शहरात डमी व्यक्ती उभा करून डॉक्टरांची जमिनी विकण्याचा प्रयत्न.
प्रतिनिधी डॉक्टर विद्या शांताराम शिंदे वय 62 वर्ष राहणार शास्त्रीनगर येरवडा या 1994 साली बारामती मध्ये डॉक्टरचा व्यवसाय करायचा त्यावेळी भावी आयुष्यातील बचत म्हणून त्यांनी बारामती शहरामध्ये 582 चौरस मीटरचा प्लॉट विकत घेतला त्यानंतर डॉक्टर व्यवसाय निमित्त त्या पुण्याला स्थलांतरित झाल्या. नंतर बारामती शहराचा विस्तार वाढत गेला जमिनीचे भाव हळूहळू वाढत गगनाला भिडले. त्यांना वाटलं […]
प्रगतशील शेतकरी श्री सतीश उद्धव ढुके यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी इंदापूर: महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने देण्यात येणारा ‘कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार अगोती नं. २ (ता. इंदापूर) गावचे सतीश उद्धव ढुके यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्काराचे वितरण पुणे येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सन्मानपत्र, शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, साडी आणि अकरा हजार रुपये रोख, असे या पुरस्काराचे […]