Home

1 min read

सामाजिक बांधिलकी जपत साई सेवा मल्टीस्पेशलिटी आय सी यु हॉस्पिटल ने केले मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

संपादक मधुकर बनसोडे. वाघळवाडी येथील साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी, पत्रकार, वकील, मु.सा.काकडे महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विविध क्षेत्रात काम करत असणाऱ्या मान्यवरांसाठी एक एप्रिल रोजी सकाळी नऊ ते तीन या वेळामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती. डॉक्टर विद्यानंद […]

1 min read

शासकीय योजनांची जत्रा पोहचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना

प्रतिनिधी सातारा, औरंगाबादला प्रायोगिक तत्वावर सुरू, मुख्य सचिवांनी साधला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद             राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवीत आहे. सामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, कुठे अर्ज करावा…कागदपत्रे काय जोडावीत…याची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून मुख्यमंत्री […]

1 min read

शिधापत्रिकांधारकांना ई-पॉस मशिनद्वारे भ्रमणध्वनी क्रमांक अद्ययावत करण्याचे आवाहन

प्रतिनिधी  पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून धान्य घेताना आपला भ्रमणध्वनी क्रमांक ई-पॉस मशिनमध्ये अंगठ्याचा ठसा देवून अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे. भ्रमणध्वनी क्रमांक अद्यावत केल्यानंतर शिधापत्रिकाधारकांना किती धान्य मिळाले याचा संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर येईल, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

1 min read

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली*

प्रतिनिधी मुंबई दि २९: भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर […]

1 min read

बारामती ! रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना यश .

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे शिरवळ ता. खंडाळा या ठिकाणी झालेल्या पहिली राज्यस्तरीय चॅम्पियनशिपतायकनदो स्पर्धेमध्ये वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. हे यश प्राप्त झाल्या बद्दल रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापक […]

1 min read

सातारा जिल्ह्यात पाण्याची टंचाई भासू लागली , उन्हाची तीव्रता वाढू लागली

दहिवडी प्रतिनिधी कोमल काळे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील अनेक भागात जस जशी उन्हाची तीव्रता वाढू लागली तस तशी पाण्याची टंचाई भासू लागली माण तालुक्यातील नवलेवाडी, सत्रेवाडी येथे पाणी टंचाई आत्तापासूनच जाणवू लागली आहे त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्यामुळे ग्रामस्थांनी माण खटाव चे नेते शेखर भाऊ गोरे यांच्याकडे पाण्याच्या टँकरची मागणी करता […]

1 min read

बारामती ! ग्रामपंचायत वडगाव निंबाळकर थकबाकीदार खातेदारांची नावे फ्लेक्स बोर्डवर खरच जाहीर करणार का ?  

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार  बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत ने सर्व घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार खातेदार यांना फ्लेक्स बोर्ड लावून कळविण्यात आले आहे की ग्रामपंचायत घरपट्टी कराची मागणी केली असताना ही अद्याप ग्रामपंचायतकडे खातेदारांनी भरणा केलेला नाही अशा खातेदारांकडून त्यांच्याकडे असणारी सर्व थकबाकी त्वरित भरण्याचे सांगितले आहे . खातेदारांनी आपली थकबाकी न भरल्यास […]

1 min read

चालू वर्षात जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक पीक कर्जवाटप* *४ हजार १३० कोटी कर्जवाटपाद्वारे मोडला गतवर्षीचा उच्चांक*

प्रतिनिधी. *जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्याची उत्तम कामगिरी* पुणे, दि. २८: पुणे जिल्ह्याने किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीक कर्ज वाटपामध्ये सलग दुसऱ्या वर्षी उच्चांक गाठत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सन २०२२-२३ मध्ये आजअखेर एकूण ४ हजार १३० कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप जिल्ह्यात झालेले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: पुढाकार […]

1 min read

आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणारे बारामती येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्र*

प्रतिनिधी. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत इंडो डच तंत्रज्ञानावर आधारीत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे अंतर्गत बारामती कृषि विज्ञान केंद्र येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्रात गेल्या पाच वर्षापासून उच्च तंत्रज्ञानावर आधारित संरक्षित शेतीमध्ये भाजीपाला लागवड पद्धती व उत्पादन करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. भाजीपाला उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये चीननंतर दुसरा क्रमांक आहे. दिवसेंदिवस आपल्या […]

1 min read

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण*

प्रतिनिधी. जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी निधी देण्यात येईल-पालकमंत्री* पुणे दि.२८: पुणे जिल्ह्यात महिला व बालविकास भवन उभारण्यासाठी आराखडा तयार करावा, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. हॉटेल लेमन ट्री येथे महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक […]