• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! शेवटचा श्रावणी सोमवार सोमेश्वर मंदिर येथे भाविकांची गर्दी ; लाखो भाविक नतमस्तक .
Image

बारामती ! शेवटचा श्रावणी सोमवार सोमेश्वर मंदिर येथे भाविकांची गर्दी ; लाखो भाविक नतमस्तक .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील सोमेश्वर करंजे येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे श्रावण मास यात्रा ही एक महिना असते या यात्रेनिमत्त स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक येत असतात . शेवटचा श्रावणी सोमवार यानिमित्ताने भाविकांसाठी मोठ्याप्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ व आनंद घेतला .

शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते यासाठी वडगाव निंबाळकर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता . यामध्ये वैद्यकीय विभाग यांनी देखील श्रावण महिन्यामध्ये भाविकांसाठी वैद्यकीय ( प्रथमोपचार ) सुविधा ठेवण्यात आली होती . सोमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून संपुर्ण महिन्यामध्ये भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी चांगल्याप्रकारे घेण्यात आली .

Releated Posts

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026