प्रतिनिधी –
दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी गणेशोत्सव २०२४ अनुशंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील सर्व मंडळाचे पदाधिकारी/अध्यक्ष यांची बैठक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे पोलिस सहायक निरीक्षक सचिन काळे यांच्या उपस्थितीत पार पडली . बैठकीमध्ये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील ४६ मंडळाचे १०० ते ११० अध्यक्ष / सदस्य उपस्थित होते.
यावेळी १) मा. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णय व आदेशानुसार ध्वनीक्षेपक संबंधी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करावे
२) मिरवणुकी मध्ये मोठ्या नियामपेक्षा मोठ्या आवाजात वाजणाऱ्या मल्टीसाउंड सिस्टीम चा वापर करु नये.
३) गणेशोत्सव कालावधीत सांस्कृतीक व इतर कार्यक्रम मध्ये रात्रौ १० वाजले नंतर आयोजन करु नये.
४) गणेशोत्सवात दर्शविण्यात येणारे देखावे/पोस्टर्स, बॅनर्स धार्मिक/जातीय भावना चिथविणारे अथवा आक्षेपार्ह नसावेत.
५) गणेशोत्सव मध्ये श्रीं. च्या मुर्तीच्या संरक्षणासाठी मंडळाचे २४ तास स्वयंसेवक नेमुन त्यांची माहीती पो.स्टे स दयावी. तसेच सी सी टी व्ही कॅमेरा लावावेत
६) गणेशोत्सव दर्शनासाठी महीला व मुलांसाठी स्वतंत्र रांगा लावाव्यात. व गर्दीमध्ये होणाऱ्या चेष्टा मस्करीला अटकाव करण्यासाठी स्वयंसेवक नेमावेत.
७) श्रीगणेशमुर्तीचे पावसाचे पाणी/आगीपासुन संरक्षण व्हावे यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
८) मंडपाचे सभोवताली वादग्रस्त फलक लावण्यात येवु नयेत
९) गणेशोत्सव मध्ये जाती जाती मध्ये किंवा धर्मा धर्मा मध्ये तेढ निर्माण होवू शकेल किंवा एखादया समाजाच्या भावना दुखावल्या जातील किंवा वैयक्तीक टिका अशी भाषणे करण्यात येवू नये.
१०) एखादी दुःखद घटना घडल्यास ध्वनीक्षेपक बंद करावा लागेल.
११) मंडपसाठी ग्रामपंचयती रीतसर परवाणगी घ्यावी, महाविरतण कडुन लाईटी मागणी करून परवाणगी घ्यावी, तसेच श्री गणेश विसर्जन मिरवणुक काढनार असेल तर रितसर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडुन परवाणगी घ्यावी. व परवानामिरवणुकीत पोलीसांनी सूचना देवून ध्वनीक्षेपक बंद करण्यास सांगितल्या नंतर ध्वनीक्षेपक तात्काळ बंद करावा. तसेच मिरवणुक वेळेत संपवावी
१२) ध्वनीक्षेपकाच्यावर नमूद केलेल्या झोनमध्ये मर्यादित केलेल्या मानांकन (डेसिबल) पेक्षा जास्त आवाज ठेवणे पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५(१) प्रमाणे गुन्हा असून त्याचे उल्लंघन करणारा ५ वर्षे कैद किंवा १,००,०००/- (एक लाख रुपये) दंडास किंवा दोन्ही शिक्षेस पात्र आहे.
१३) मिरवणुकीत कोणताही दाहक पदार्थ अथवा स्पोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेवु नये
१४) मिरवणुकीतील प्रक्षोभक घोषणा देवु नये.
१५) मिरवणुकीतील वाहनांची प्रादेशिक परीवहन अधिकारी (आर. टी.ओ) कडुन तपासणी करुन घेण्यात यावी . तसेच वाहनांची संख्या एकच असावी व वाहन सुस्थितीतील असावे.
१६) उपद्रवी लोकांना मिरवणुकीत सहभागी करण्यात येवु नये.
१७) मिरवणुक कार्यक्रमाचे संपुर्ण व्हीडीओ शुटींग करावे तसेच गणपती उस्तवामध्ये समाजउपयोगी उपक्रमांवर भर देणे, तसेच वर्गणी मागताना लोकांकडुन दमदाटी करून पैसे मागु नयेत .
अश्या प्रकारच्या सुचना वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्य पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्याकडून देण्यात आले आहेत.