Home
दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त तिन्ही सेवादल प्रमुखांकडून पुष्पचक्र अर्पण
प्रतिनिधी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम, एडीसी , यांनी दिवंगत जनरल बिपिन रावत, पीव्हीएसएम, युवायएसएम, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, एडीसी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी , खडकवासला येथील आयकॉनिक हट ऑफ रिमेंबरन्स […]
बाल निरीक्षक गृहात राहणारा अनाथ बनला शासनाचा अधिकारी
प्रतिनिधी काही वर्षांपूर्वी अक्षर ओळख होण्यापूर्वीच अगदी लहान वयात बारामती येथील बाल सुधाग्रहात दाखल झालेला अनिल माणिक जाधव. याने अनाथ म्हणून बाल निरीक्षण गृह बारामती या ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. कुणीही जवळचे नातेवाईक नाहीत बाल निरीक्षण गृहातील इतर साथीदार हेच त्याची भावंड व बाल निरीक्षण गृहातील सर्व अधिकारी वर्ग हेच त्याचे पालक. ज्या काही सुविधा […]
बारामती तालुका पोलीस स्टेशन हददीत एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरलाच लुटारूंनी लुटले! मग काय बारामती तालुका पोलीसांनी अवघ्या चार तासातच आरोपींना ताब्यात घेतले.
प्रतिनिधी बारामती तालुका पोलीस स्टेशन हददीमध्ये दि. 4/12/2022 रोजी रात्री 08/30 वा चे सुमारास महिला सोसायटी समोरील ऑक्सीजन प्लांट जवळ एमआयडीसी बारामती येथे इसम नामे देवेंद्र संतोष वेताळ वय- 21 वर्ष व्यावसाय-वैद्यकीय शिक्षण रा. सध्या बॉईज हॉस्टेल मेडिकल कॉलेज बारामती. हा रविवार सुट्टीचा दिवस असल्याने काही आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी एकटाच सुभद्रा मॉल पेन्सिल चौक […]
अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विनामूल्य कोचिंग
प्रतिनिधी. स्पर्धात्मक परीक्षांसाठी अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कोचिंग घेता यावे, या उद्देष्याने अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य कोचिंग केंद्रीय योजना अमलात आणली जात आहे. याअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब अनुसूचित जाती तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वित्तीय सहाय्य देण्यात येत आहे. मात्र अशीच समान विशिष्ट योजना अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नाही.या योजनेंतर्गत, विद्यार्थ्यांची निवड़ […]
नागपूर हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
प्रतिनिधी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना लिहीले पत्र मुंबई, दि. 7 डिसेंबर 2022 :विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैद्राबादशी जवळचा व्यापारी संबंध असल्याने नागपूर हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस लवकरात सुरू करावी अशी मागणी राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर आणि गोंदियाचे पालकमंत्री ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे.नागपूर हे […]
वाघळवाडीतील या मतदाराला का लावावा लागला दारावरती असा बॅनर?.
संपादक मधुकर बनसोडे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी ग्रामपंचायत ची निवडणूक लागली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वागळवाडीतील सुरेश यादव यांनी आपल्या दरवाजा बाहेर एक संदेश देणारा बॅनर लावला आहे आणि या संदेश मध्ये असं म्हटलं आहे. समाजकंटक,भ्रष्टाचारी, व भ्रष्टाचाराला अभय देणाऱ्या उमेदवारांनी मत मागणी करता आल्यास अपमानित करण्यात येईल. या मतदारास असा बॅनर लावण्याची वेळ का आली […]
महिला आत्मनिर्भर झाल्यास देशाचा विकास निश्चीत आहे – ना. सुधीर मुनगंटीवार
प्रतिनिधी आत्मनिर्भर भारत कार्यक्रमात ना. मुनगंटीवार यांची उपस्थिती व मार्गदर्शन. आजही अनेक ठिकाणी महिला या छोटया छोटया गोष्टींसाठी घरातील पुरूषांवर अवलंबून असतात. जर सर्व महिला आत्मनिर्भर झाल्या तर त्यांच्या व्यक्तीगत विकासाबरोबरच देशाचा विकासही निश्चीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भाजपा जिल्हा […]
वडगाव निंबाळकर प्रशालेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर या प्रशालेमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बहुजन हक्क परिषद बारामती तालुका युवक अध्यक्ष […]
नाथ्रा येथे मराठी ग्रामिण साहित्य संमेलनानातील विविध पुरस्कारासाठी 16 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन- डॉ.एकनाथ मुंडे
प्रतिनिधी श्रीनाथ मानव सेवा मंडळाच्या वतीने सहावे मराठी ग्रामिण साहित्य संमेलनाची नाथ्रा येथे मंगळवार दि. 3 जानेवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे. तसेच या संमेलनात विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी ग्रामिण मराठी साहित्य संमेलनातील पुरस्कारसाठी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन संयोजक डॉ.एकनाथ मुंडे नाथ्राकर यांनी केले […]
निंबुत ग्रामपंचायतच्या वतीने महामानवास अभिवादन करण्यात आले.
संपादक मधुकर बनसोडे. ग्रामपंचायत निंबुत येथे आज सकाळी दहा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास आदरांजली वाहून महामानवांच्या विचारांची देवाण-घेवाण करण्यात आली. यावेळी निंबुत ग्रामपंचायत सरपंच निर्मला काळे, उपसरपंच अमर काकडे, सदस्य, विद्याताई काकडे, कुमोदिनी काकडे, प्रमोद बनसोडे, नंदकुमार काकडे, ग्रामपंचायत नींबूतचे ग्रामसेवक गावडे भाऊसाहेब, क्लार्क भाऊसाहेब कोळेकर, राजेंद्र काकडे, नाना धुमाळ, […]