Home

1 min read

सबसे कातील… गौतमी पाटील फलटण तालुक्यात लावणीच्या कार्यक्रमात डोकी फुटली…

प्रतिनिधी- फिरोज भालदार सांगलीत एक जण जिवानिशी गेला.. आता फलटण तालुक्यात ही काल रात्री म्हणे डोके फुटाफुटी झाली.. अलीकडच्या काही महिन्यात लावणी मध्ये इतरांची नावे मागे पडून अचानकच गौतमी पाटील हे नाव पुढे आले आहे …या गौतमी पाटील लावणीच्या कार्यक्रमात अश्लील हावभाव केल्यानंतर तिची हवा झाली . अर्थातच चांगल्याची हवा होतच नाही.. काहीतरी वेगळे करावे […]

1 min read

गुजरात मधून आणलेले सिंह उद्या सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडणार

मुंबई: गुजरात मधून आणलेली सिंहांची जोडी उद्या मंगळवारी सहा डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोडण्यात येणार आहेत. ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली आहे. हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन वर्षे वयाचे आहेत. मुंबईतील वातावरणाशी परिचित होण्यासाठी काही काळ […]

1 min read

अमृत महोत्सवी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना गती द्या

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश नागपूर ला ग्रामविकास विभागाचे भव्य ‘महारुद्र’ केंद्र उभारणार विविध विभागांकडून घेतला अमृत महोत्सवी कामांचा आढावा मुंबई, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व नियोजित कामांना गती देऊन दर्जा व वेळ यांस प्राधान्य द्या असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. या […]

1 min read

माळेगाव पोलिसांनी गायी चोरीचा गुन्हा उघड करून २ आरोपींना केली अटक

प्रतिनिधी चोरीस गेलेल्या २ गाय व कालवड सह एकूण १ गायी, ३ कालवडी, वाहन असा एकूण ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र मधील मौजे मेडद ता.बारामती जि.पुणे या गावचे हद्दीतून दिनांक – ०२/१२/२०२२ रोजी यांचे मध्यरात्री ०१.३० वा.चे सुमारास श्री.महादेव पांडुरंग पानगे रा.सदर यांचे घरा समोर बांधलेल्या एक काळे […]

1 min read

आपल्या विरोधी विचार मांडणारा देशद्रोही ठरविणे चुकीचे – डाॅ.के.एल.गिरमकर

प्रतिनिधी मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.मुगुटराव साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१ / १२ / २०२२ ते ०३/ १२ / २०२२ दरम्यान तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे..दि. ०१/१२/२०२२ रोजी व्याख्यानमालेच्या पहिल्या उद्घटनाच्या दिवशी ‘मानवी मूल्ये आणि शिक्षण ‘ या विषयावर प्रा.डाॅ. कान्हू गिरमकर यांनी विचार मांडले. भारत हा बहुसांस्कृतिक व बहुभाषिक […]

1 min read

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी हा सांस्कृतिक दहशतवाद – प्राचार्य महेंद्र कदम

कदममुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.मुगुटराव साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१ / १२ / २०२२ ते ०३/ १२ / २०२२ दरम्यान तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. दि. ०२/१२/२०२२ रोजी व्याख्यानमालेच्या दुसर्‍या दिवशी ‘सांस्कृतिक दहशतवादाचे राजकारण ‘ या विषयावर प्राचार्य.डाॅ. महेंद्र कदम यांनी विचार मांडले. भारतीय संस्कृती व परंपरा यांचा नव्याने अन्वयार्थ […]

1 min read

मेहकर इंटरचेंज येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन.

बुलडाणा, दि. 4 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण होत असलेल्या हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याची आज पाहणी केली. यादरम्यान जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार अॅड. आकाश फुंडकर, संजय रायमूलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी […]

1 min read

टिचभर रॉयल्टी भरून इथभर मुरूम वाहतूक करणाऱ्यांना बारामती तालुक्यात आशीर्वाद कुणाचा.?.

संपादक मधुकर बनसोडे. बारामती तालुक्यातील अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांवरील पकड निष्ठत चालली आहे की काय अशी चर्चा तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे. बारामती तालुक्यात मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणात केले जात आहे मात्र तहसीलदार, सर्कल,तलाठी. यांच्यासमोर टिचभर रॉयल्टी भरून इथभर मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. बारामती तहसील मुरूम वाहतूक करणाऱ्या मुरूम माफीयां च्या विरोधात कारवाई करण्यासाठी हतबल […]

1 min read

बारामती! पणदरे येथील दोघांना जबरी मारहाण : दोन जणांविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

प्रतिनिधी- फिरोज भालदार पणदरे ता. बारामती येथील दोघांना दोन जणांकडून जबरी मारहाण दोन जणांवर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अशोक सुखदेव बळे वय 45 वर्षे रा. पणदरे कुंभार गल्ली ता. बारामती जि. पुणे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यावरून गोपी ढोपरे रा. बाबुर्डी ता. बारामती जि. पुणे व […]

1 min read

बारामती ! भूमीहीन व गरीब लोकांची अतिक्रमणे काढु नये : वडगाव निंबाळकर ग्रामस्थांची ग्रामपंचायतकडे मागणी.

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे गायरान गटामध्ये राहत असणाऱ्या लोकांना वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत च्या वतीने अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बजावल्या होत्या. या नोटिसांचा खुलासा देण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडून दहा दिवसाची मुदत देण्यात आली होती. त्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर येथील महिला व ग्रामस्थ तसेच जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने […]