बारामती! वडगाव निंबाळकर येथे कृषीकन्यांमार्फत ‘ झाडे लावा झाडे जगवा ‘ संदेश देत वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

आपण सध्याची परिस्थिती पाहत आहोत की सर्वत्र जास्त प्रमाणात झाडांची लागवड होण्याऐवजी झाडांची तोड होताना आपल्याला दिसत आहे . याच अनुषंगाने बारामती मधील कृषीकन्या यांनी एक वेगळा उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे . याच अनुषंगाने ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट टस्ट्र संचलित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्य‌क्रमांतर्गत वडगाव निंबाळकर येथील स्वतंत्र विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण केले.

यावेळी वडगाव निंबाळकर गावचे सरपंच सुनिल ढोले , मुख्याध्यापक साठे सर, संजय साळवे, धर्यशीलराजे राजेनिंबाळकर, अजित भोसले, निलेश दरेकर सर, तांबे सर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, प्राध्यापक आणि शालेय विद्‌यार्थी यांनी कृषीकन्यांसमवेत वृक्षारोपन केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण ही एक महत्त्वकांक्षी मोहिम कृषीकन्यांनी हाती घेतली आहे. वृक्षारोपन ही मानवी जीवन आणि निसर्ग परस्परावलंबाचे प्रतिक आहे . जे आपल्या भविष्या‌साठी एक समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यास मदत करत असे कृषीकन्याकडून संबोधण्यात आले .

या वृक्षारोपणामध्ये कृषीकन्या साक्षी कोते ,नेहा पाटील ,अदिती माने,नेहा पडवळ, दिक्षा मोरे , ज्ञानेश्वरी खळदकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन करून यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडला. ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन श्री राजेंद्र पवार , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री निलेश नलावडे, प्राचार्या प्रा. जया तिवारी, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलकंठ जंजिरे, कार्यक्रम अधिकारी डॉ .पल्लवी देवकाते, डॉ. मयुर पिसाळ ,प्रा.शिवानी देसाई, प्रा.अभिषेक गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला .