मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 25 February 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

निंबुत येथील ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करून वडगाव निंबाळकर पोलिसांनी 3,59,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
February 25, 2026 1 मिनिट वाचन 8,516 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नींबूत गावच्या हद्दीत ओढ्यालगत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रमोद प्रकाश नवले राहणार लक्ष्मीनगर निंबुत तालुका बारामती जिल्हा पुणे हा गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर स्टाफ सहित रवाना होऊन सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, 03 नग लोखंडी बॅरल मध्ये कच्चे रसायन, जमिनीत 10×20×03 खड्ड्यामध्ये कच्चे रसायन, 02 नग प्लॅस्टिकच्या टाक्या, 24 नग 35 लिटल क्षमतेचे हातभट्टी गावठी दारू, 04 नग विद्युत मोटर पंप व इतर साहित्य असा एकूण 3,59,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई मा. संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा. अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार पोपट नाळे, अनिल खेडकर, महिला पोलीस हवालदार शुभांगी दणाने,पोलीस अंमलदार आबा जाधव,नरेंद्र यादव, धनंजय भोसले, विकास येटाळे,महिला पोलिस अंमलदार प्रियंका झणझणे, चालक पोलीस हवालदार विजय शेंडकर यांनी मिळून केली आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख