• Home
  • ताज्या बातम्या
  • मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये जिल्हास्तरीय रोजगार महामेळावा संपन्न.
Image

मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये जिल्हास्तरीय रोजगार महामेळावा संपन्न.

प्रतिनिधी.

महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व कौशल्य विकास आणि उद्योजकता केंद्र या आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वर नगर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयांमध्ये जिल्हास्तरीय रोजगार महामेळावा संपन्न झाला यामध्ये जिल्ह्यातील विविध भागातील एकूण वीस कंपन्यांनी सहभाग नोंदवला आणि एकूण 357 उमेदवारांनी मुलाखती दिल्या त्यापैकी 152 उमेदवारांना या मेळाव्यामध्ये नोकरी मिळाली आहे. रोजगार महामेळाचे उद्घाटन माजी विद्यार्थी आर. एन. शिंदे सभागृहामध्ये पार पडले. महामेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून प्रसिद्ध उद्योजक आर. एन. बापू उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अभिजीत काकडे देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास वायदंडे होते. उद्घाटन कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये व्यवस्थापन समितीचे सचिव सतीश लकडे, महाराष्ट्र शासनाच्या वतीने कौशल्य विकास अधिकारी राजेश धर्माधिकारी, रामेश्वरी पालवी, श्री राजू डोईफोडे, अजय रणदिवे उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सध्याच्या काळात युवकांसमोरील असलेली आव्हाने आणि नोकऱ्यांचे घटते प्रमाण लक्षात घेता अशा रोजगार मेळाव्यांची गरज आणि महत्व अधोरेखित केले आणि भविष्यातही महाविद्यालयातर्फे असे महामेळावे आयोजित करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील असे सांगितले. महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास अधिकारी श्री. राजेश धर्माधिकारी यांनी आपले आपले मनोगत व्यक्त करत असताना शासन ग्रामीण भागातील युवकांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्नशील असून युवकांनी आपल्या अंगी व शक्ती पात्रता आणि कौशल्य निर्माण करावीत तरच त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील असे आवाहन केले तसेच शासनाकडून जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या विविध विभागात असे मिळावे आयोजित केले जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक रोजगार मेळाव्याचे समन्वयक प्रा. राहुल खरात यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. अच्युत शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. आरती भाग यांनी केली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवक उपस्थित होते.

Releated Posts

महाराष्ट्र शासन करिअर कट्टा राज्य नियोजन समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल रामेश्वर मोरे यांचा उद्योग मंत्र्याच्या हस्ते मुंबईत गौरव

प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने…

ByBymnewsmarathi Feb 26, 2026

निंबुत येथील ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करून वडगाव निंबाळकर पोलिसांनी 3,59,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नींबूत गावच्या हद्दीत ओढ्यालगत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रमोद प्रकाश नवले…

ByBymnewsmarathi Feb 25, 2026

श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयात पाककला उपक्रम उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात आज वार शनिवार दिनांक २१/ ०२ /२०२६ रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा

प्रतिनिधी. इद्रायणी  नदी संवर्धनासाठी देहू–आळंदी–चऱ्होली येथे भव्य स्वच्छता अभियान आळंदी , १९ फेब्रुवारी २०२६ : जेव्हा सेवा हीच…

ByBymnewsmarathi Feb 20, 2026