मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 22 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

निंबुतचा अभिमान – अली रियाज सय्यदची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

mnewsmarathi 03 Apr 2026 1 मिनिट वाचन 9,089 वाचन

प्रतिनिधी.
नुकत्याच बालेवाडी, पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जूनियर कुस्ती स्पर्धेमध्ये निंबुत (ता. बारामती, जि. पुणे) येथील उदयोन्मुख कुस्तीपटू अली रियाज सय्यद याने दमदार कामगिरी करत महाराष्ट्रातून ओपन गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या शानदार यशामुळे त्याची आगामी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
अलीने स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, चपळता आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद मिळवले. त्याच्या या यशामुळे निंबुत गावासह संपूर्ण बारामती तालुक्याचा मान उंचावला आहे.
अली सध्या कोल्हापूर, पुणे आणि हरियाणा येथे प्रगत स्तरावर कुस्तीचे प्रशिक्षण घेत असून, अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तो आपली कौशल्ये अधिक धारदार करत आहे. त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच त्याला हे यश मिळाले आहे.
अलीच्या या यशाबद्दल गावातील नागरिक, क्रीडाप्रेमी तसेच विविध मान्यवरांकडून त्याचे कौतुक होत आहे. अनेकांनी त्याला पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या असून, तो राष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्राचे नाव उज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अली रियाज सय्यदच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळत असून, निंबुत गावासाठी ही एक अभिमानाची बाब ठरली आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi