• Home
  • ताज्या बातम्या
  • वडगाव निंबाळकर पोलिसांनी नागरिकांचे ४ लाख ५ हजार रुपये किंमतीचे हरविलेले एकूण १३ मोबाईलचा शोध घेऊन केले मूळ मालकांना परत.
Image

वडगाव निंबाळकर पोलिसांनी नागरिकांचे ४ लाख ५ हजार रुपये किंमतीचे हरविलेले एकूण १३ मोबाईलचा शोध घेऊन केले मूळ मालकांना परत.

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे हरविलेले मोबाईल संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने मा. श्री. संदीप सिंह गिल्ल (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे आदेशान्वये व त्यांचे मार्गदर्शनाखाली हरवलेली मोबाईल शोध घेऊन नागरिकांना परत करण्याबाबत पोलीस हवालदार अनिल खेडकर व इतर स्टाफ याचे पथक नेमून तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन ते नागरिकांना परत करणे संदर्भात वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत पथक नेमण्यात आले होते. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मोबाईल शोध पथक यांनी खालील प्रमाणे मोबाईल जप्त केले आहेत.
१) श्री. उदय तानाजी दरेकर, रा. वडगांव निंबाळकर – ₹१७,०००/- (विवो वाय ५१)
२) श्री. प्रदीप ज्ञानदेव पवार, रा. निंबुत – ₹३६,०००/- (विवो व्ही ४० ई)
३) श्री. इंद्रसेन दीपक शिंदे, रा. वडगांव निंबाळकर – ₹२०,०००/- (समसंग कंपनी)
४) श्री. नितीन अनिल देशमुख, रा. माळवाडी लाटे – ₹१,१०,०००/- (आयफोन ११ प्रो)
५) श्री. प्रशांत संभाजी भंडलकर, रा. करंजे – ₹१०,५००/- (रिअलमी ३)
६) श्री. अशोक महादेव ठोंबरे, रा. साखरवाडी ता. फलटण – ₹१५,०००/- (रिअलमी नाझो ५० आय)
७) कु. प्रांजली ज्ञानेश्वर शिंदे, रा. मुरूम – ₹१,०६,५००/- (आयफोन १३ प्रो)
८) रणजित सुभाष पवार, रा. वडगांव निंबाळकर – ₹२६,०००/- (IQOO)
९) श्री. विजय यशवंत भापकर, रा. चौधरवाडी – ₹१४,०००/- (सॅमसंग वन प्लस)
१०) श्री. दत्तात्रय संताजी गाडेकर, रा. वाकी – ₹१३,०००/- (विवो वाय ३२)
११) संगिता रंगनाथ मारने, रा. सस्टेवाडी – ₹१५,०००/- (सॅमसंग ए ५१)
१२) सोमनाथ दत्तात्रय खांडेकर, रा. सस्टेवाडी – ₹११,९९९/- (विवो)
१३) श्रीधर राजेंद्र जगताप, रा. पुणे – ₹१०,०००/- (विवो वी १६)
असे एकूण ४ लाख ५ हजार रुपये किंमतीचे एकूण १३ मोबाईलचा शोध घेऊन वडगांव निंबाळकर पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणाहून घेऊन रोजी वरील प्रमाणे नमूद मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. संदीप सिंह गिल्ल सो. (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. रमेश चोपडे सो. अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग,मा. श्री. गणेश बिरादार सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, डॉ. श्री. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा. प्रमोद क्षीरसागर, पो.नि.स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस हवालदार अनिल खेडकर, पोपट नाळे, हदसनाथ देवकर, विलास ओमासे वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.

Releated Posts

बारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन पुणे, दि. २९: “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ,…

ByBymnewsmarathi May 29, 2026

श्री क्षेत्र वीर येथे अभाविप बारामती आयोजित “सह्यादी स्पर्श” समर कॅम्प उत्साहात संपन्न

प्रतिनिधी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बारामती जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “सह्यादी स्पर्श” हा तीन दिवसीय समर…

ByBymnewsmarathi May 25, 2026

बारामती! गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे : बारामती मुस्लिम समाजाची मागणी

प्रतिनिधी – बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने दिनांक २५ मे रोजी प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) तसेच बारामती…

ByBymnewsmarathi May 25, 2026

बारामती तालुक्यात गोवंश कत्तलीचा पर्दाफाश; रक्तमिश्रित साहित्य जप्त

प्रतिनिधी. माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जनावरांच्या अवैध कत्तलीप्रकरणी तीन जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या…

ByBymnewsmarathi May 20, 2026