• Home
  • ताज्या बातम्या
  • ३५ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास साथीदारासह अटक करून पुणे ग्रामीण हद्दीतील दोन व ठाणे शहर आयुक्तालयातील एक असे एकूण तीन खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश.
Image

३५ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास साथीदारासह अटक करून पुणे ग्रामीण हद्दीतील दोन व ठाणे शहर आयुक्तालयातील एक असे एकूण तीन खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश.

प्रतिनिधी.
स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी
​खेड पोलीस ठाणे गु.र.नं. १५३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे दि. १८/०३/२०२६ रोजी दाखल आहे. सदर गुन्ह्यात जैदवाडी ता. खेड जि. पुणे येथे मोकळ्या जमिनीत मयत नामे धनंजय मारुती घेवडे वय ३३ वर्षे, रा. राक्षेवाडी, ता. खेड जि.पुणे मुळ रा. कारेगाव ता. आंबेगाव, जि. पुणे याचा मृतदेह आढळून आला होता. मयताचे डोक्यावर व तोंडावर कोणत्यातरी हत्याराने मारहाण करणेत आली होती. मयत धनंजय घेवडे याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने खून केला असल्याबाबत मयताचा भाऊ श्री. सचिन मारुती घेवडे वय ३६ वर्षे रा. कारेगाव ता. आंबेगाव जि. पुणे यांनी फिर्याद नोंदविली असल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.
​मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाचे वतीने समांतर तपास सुरू करणेत आला. घटनास्थल हे दुर्गम भागात असल्याने सीसीटीव्हीचा अभाव होता. घटनास्थळापासून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, अभिलेखावरील सराईत गुन्हेगार ललित दिपक खोल्लम रा. शिरोली ता. खेड जि. पुणे व त्याचा एक साथीदार असे घटनास्थळापासून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आढळून आले. फुटेजमधील दुसऱ्या संशयिताची माहिती प्राप्त केली असता त्याचे नाव नंदलाल होले रा. कारेगाव ता. आंबेगाव जि. पुणे असे निष्पन्न होऊन तो देखील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. ललित खोल्लम व नंदलाल होले हे सराईत गुन्हेगार असून ते खून झालेल्या घटनास्थळाच्या परिसरात आढळून आल्याने त्यांच्यावर संशय बळावला. स्था.गु.शा.चे पथकाने दोन्ही संशयितांच्या सीसीटीव्ही फुटेजचे आधारे खेड ते वडगाव निंबाळकर असे सुमारे ४५ किमी पर्यंत सलग सहा दिवस सुमारे ११० कॅमेऱ्यांचा मागोवा घेण्यात आला. दोन्ही संशयित गुन्हेगार हे वडगाव निंबाळकर परिसरात असल्याची बातमी गोपनीय बातमीदाराकडून मिळाली, दि. २५/०३/२०२६ रोजी स्था.गु.शा.चे पथक, खेड पो स्टे कडील पथक व वडगाव निंबाळकर पो स्टे कडील स्थानिक पोलीस अधिकारी मदत कामी सोबत घेऊन वडगाव निंबाळकर परिसरात योग्य पद्धतीने सापळा लावणेत आला. आजू- बाजूला असलेल्या उसाचे शेतांना घेराव घालणेत आला, संशयितांचा शोध घेत असताना पोलिसांची चाहूल लागल्याने दोन्ही गुन्हेगारांनी उसाचे शेतातून पळ काढून नदीचे दिशेने पळत सुटले, तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय शीघ्रतेने पाठलाग करून आरोपींनी नदीपात्रात उडी मारण्यापूर्वीच शिताफीने दोघांनाही ताब्यात घेतले.
​आरोपी १) ललित दिपक खोल्लम वय ३८ वर्षे, रा. शिरोली, शिंदेवस्ती ता. खेड जि पुणे, २) नंदलाल दिलीप होले वय ३१ वर्षे, रा. कारेगाव ता. आंबेगाव जि पुणे, यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींना विश्वासात घेतल्यानंतर आरोपींनी खुनाचे गुन्ह्यांची मालिका सांगितली. आरोपी नंदलाल होले व मयत धनंजय घेवडे असे एकाच गावात सध्या राहत आहेत, धनंजय घेवडे व नंदलाल होले यांचेच भांडण झाले होते, तसेच त्याच गावातील निलेश कैलास सणस याचेसोबत देखील धनंजय घेवडे याचा वाद होता, त्या वादाचे कारणावरून आरोपी ललित खोल्लम व नंदलाल होले यांनी मिळून संगनमताने (मयत) धनंजय मारुती घेवडे वय ३३ वर्षे, रा. राक्षेवाडी, ता. खेड जि.पुणे मुळ रा. कारेगाव ता. आंबेगाव, जि. पुणे याचे डोक्यात लोखंडी रॉड व दगडाने मारून खून केला असल्याचे कबूल केले आहे. आरोपी ३) निलेश कैलास सणस वय ३४ वर्षे, रा. कारेगाव ता. आंबेगाव जि. पुणे याने इतर आरोपींना गुन्हा करणेकरीता पैसे पुरविले असल्याची माहिती तपासात समोर आल्याने त्यास देखील गुन्ह्याचे कामी ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना अटक करणेत आलेली आहे.
​मयत धनंजय घेवडे याचा खून करण्यासाठी वापरलेले लोखंडी रॉड, दगड जप्त केला असून गुन्हा करताना आरोपीचे अंगावर असलेले कपडे त्यांनी जाळून टाकले होते, ते ठिकाण तपासून कपडे ज्या ठिकाणी जाळले आहेत, त्या ठिकाणावरील राख हस्तगत करणेत आलेली आहे. त्याचप्रमाणे आरोपींनी मयत धनंजय घेवडे याचा मोबाईल फोन हा गुन्हा करून जाताना वाफगाव गावाजवळील विहिरीत टाकून दिला होता, तो मोबाईल देखील हस्तगत करणेत आलेला आहे.
​आरोपी ललित खोल्लम याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याचे विरोधात यापूर्वी ०२ खून, खुनाचा प्रयत्न ०१, दरोडा प्रयत्न ०२, जबरी चोरी १०, घरफोडी व चोरीचे २० असे एकूण ३५ गुन्हे सातारा, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय, हद्दीत दाखल आहेत. त्याचप्रमाणे आरोपीने जबरी चोरी करताना अवैध गावठी पिस्तुलाचा वापर केलेला आहे. आरोपी नंदलाल होले याचेवर देखील दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. दोन्ही आरोपीवर यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणेत आलेली असून ते सध्या जामिनावर बाहेर आले आहेत.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, आरोपी ललित खोल्लम याचे एका महिलेसोबत  सोबत प्रेमसंबंध होते, त्याकारणातून ती नेहमी त्याच्याकडे पैसे मागत होती, पैसे मागण्याचे कारणावरून त्यांचे नेहमी भांडण होत होते, त्यादरम्यान तिचा मुलगा  देखील आरोपी ललित खोल्लम याचेकडे पैशाची मागणी करत होता. त्या गोष्टीचा राग आरोपी ललित खोल्लम याचे डोक्यात होता, प्रियसी महिला व तिचा मुलगा  ठाणे येथे असताना दि.०७/११/२०२५ रोजी पैसे देतो अशी फुस लावून त्याने (मयत) श्रीकांत विलास वाडेकर वय २६ वर्षे मुळ रा. शिरोली ता. खेड जि पुणे यास खेड येथे बोलावून घेऊन त्याचे अपहरण केले आणि श्रीकांत वाडेकर यास शिरोली येथील फ्लॅट वर नेवून त्याचे डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून केला आणि आरोपी नंदलाल होले याचे मदतीने श्रीकांत वाडेकर याचा मृतदेह मंचर परिसरात नेवून जाळून टाकला व मृतदेहाची विल्हेवाट लावली. तसेच मयताची राख गोळा करून घोडनदीपात्रात सोडून दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. श्रीकांत वाडेकर याचे अपहरण करून त्याचा खून करणेत आला असल्याचे आरोपींनी कबुल केले असून त्याबाबतचा महात्मा फुले चौक, ठाणे शहर पो. स्टे. गु.र.नं. १२३९/२०२५ बी.एन.एस. १४० (२) प्रमाणे दाखल असून गुन्ह्यास बी.एन.एस. १०३ हे कलम वाढ झालेली आहे.
श्रीकांत वाडेकर याची आई रूपाली वाडेकर ही आरोपी ललित खोल्लम यास माझा मुलगा श्रीकांत कोठे आहे? असे वारंवार विचारत होती, आरोपी ललित खोल्लम सोबत भांडण करत होती, त्यामुळे आरोपी ललित खोल्लम याने तिला ठाणे येथून शिरोली येथे बोलावून घेतले आणि दि. १३/११/२०२५ रोजी तिचे शिरोली येथील फ्लॅटवर जावून (मयत) रूपाली विलास वाडेकर वय ४६ वर्षे रा. शिरोली ता. खेड जि. पुणे हिचे डोक्यात लोखंडी रॉड मारून तोंडावर व गळ्यावर चाकूने वार करून तिचा देखील खून केला असल्याचे सांगितले असून खेड पो स्टे गु.र.नं. ६३८/२०२५ बी.एन.एस. १०३ (१) प्रमाणे दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे.
आरोपी ललित खोल्लम व नंदलाल होले यांनी रूपाली विलास वाडेकर रा. शिरोली ता. खेड हिचा खून केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना खेड पो स्टे गु.र.नं. ६३८/२०२५ बी.एन.एस. १०३ (१) या गुन्हयात वर्ग करून घेऊन अटक करणेत आलेली असून त्यांना मा. न्यायालयासमक्ष उपस्थित केले असता दि. १३/०४/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आलेली आहे.
एकंदरीत आरोपींकडे केलेल्या सखोल कौशल्यपूर्ण तपासात आरोपींनी खेड पो.स्टे. ला दाखल असलेले ०२ खून, ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत दाखल असलेला ०१ खून असे एकूण ०३ खुनाचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. तसेच आरोपी ललित खोल्लम याने फरार कालावधीत मध्यप्रदेश येथून दोन गावठी पिस्तुल व चार काडतुसे आणून विक्री केली होती, त्या अनुषंगाने कारवाई करून दोन गावठी पिस्तुल व चार काडतुसे हस्तगत करणेत आलेली आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, सो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल मांडवे, खेड उपविभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड, बारामती उपविभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापुराव दडस, दौंड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, खेड पो स्टे चे पो.नि. सुभाष चव्हाण, स्था.गु.शा.चे सपोनि महादेव शेलार, सपोनि कुलदीप संकपाळ, वडगाव निंबाळकर पो.स्टे.चे सपोनि नागनाथ पाटील, स्था.गु.शा.चे पोसई अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, अक्षय नवले, राजू मोमीण, अतुल डेरे, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, श्रेणी पोसई विनोद भोकरे, मंगेश थिगळे, भाऊसाहेब पुंड, अजय देडे, बाळासाहेब खडके, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, अजय घुले, राहूल पवार, रणजित कोंडके, खेड पो स्टे कडील पोसई श्रीकांत गोडगे, पोसई महेश गरड, श्रेणी पोसई शंकर भवारी, अंमलदार जिजाबापू बिडकर, सुदर्शन माताडे, महेश गोसावी, स्वप्निल लोहार, गोकुळ कोळी, संकेत कवडे, प्रविण आढारी, ऋषीकेश गोपतवाड, म.पो.कॉ. वैशाली कांबळे, वडगाव निंबाळकर पो स्टे चे अंमलदार पोपट नाळे, हृदयनाथ देवकर यांनी केली असून पुढील तपास खेड पोलीस स्टेशन करते आहे.

Releated Posts

निरा नदी प्रदूषणाबाबतचे आरोप निराधार – पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी. श्री सोमेश्वर सह साखर कारखान्याकडून कोणत्याही प्रकारचे सांड‌पाणी अथवा केमिकलयुक्त पाणी निरा नदीमध्ये सोडले जात नसल्याचे कारखान्याच्या…

ByBymnewsmarathi Apr 6, 2026

माळेगाव काॅलनी शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी. विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा (आनंद बाजार) उत्साहात साजरा बारामती – बारामती नगरपरिषद शाळा,माळेगाव काॅलनी येथे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा…

ByBymnewsmarathi Apr 3, 2026

निंबुतचा अभिमान – अली रियाज सय्यदची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी. नुकत्याच बालेवाडी, पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जूनियर कुस्ती स्पर्धेमध्ये निंबुत (ता. बारामती, जि. पुणे) येथील उदयोन्मुख…

ByBymnewsmarathi Apr 3, 2026

वडगाव निंबाळकर पोलिसांनी नागरिकांचे ४ लाख ५ हजार रुपये किंमतीचे हरविलेले एकूण १३ मोबाईलचा शोध घेऊन केले मूळ मालकांना परत.

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे हरविलेले मोबाईल संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने…

ByBymnewsmarathi Apr 3, 2026