• Home
  • ताज्या बातम्या
  • निंबूतच्या पै अली रियाज सय्यदचा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत झंझावाती विजय; पदकाची कमाई
Image

निंबूतच्या पै अली रियाज सय्यदचा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत झंझावाती विजय; पदकाची कमाई

प्रतिनिधी.
निंबूत ता. बारामती, जि. पुणे येथील होतकरू कुस्तीपटू पै. अली रियाज सय्यद याने राष्ट्रीय पातळीवर झंझावाती कामगिरी करत मोठे यश संपादन केले आहे. छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अंडर-२० कुस्ती स्पर्धेत अलीने उत्कृष्ट खेळ दाखवत मानाचे पदक पटकावले आहे. त्याच्या या यशामुळे संपूर्ण निंबूत गावासह परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
अली सय्यद हा पदक पटकावून मायदेशी रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी परत येणार असून, त्याच्या स्वागतासाठी गावात उत्साहाचे वातावरण आहे. आपल्या परिसरातून राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवणारा तो पहिलाच कुस्तीपटू ठरला आहे, ही बाब विशेष अभिमानाची मानली जात आहे.
या स्पर्धेसाठी अलीला हरियाणा येथील अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले, तर पुणे येथील काका वस्ताद तालीम मधील वस्तादांनी त्याच्या सरावात मोलाची साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच अलीने राष्ट्रीय स्तरावर आपली ताकद सिद्ध केली.
अलीच्या या यशानिमित्त निंबूत येथील कुस्ती मैदानात त्याच्यासाठी ५१ हजार रुपयांच्या बक्षीसावर कुस्ती लावण्यात येणार आहे. या कुस्तीमध्ये त्याचा प्रतिस्पर्धी हरियाणा येथील बलाढ्य मल्ल असणार असून, या सामन्यातही अली यश मिळवेल याबाबत ग्रामस्थांमध्ये कोणतीही शंका नाही.
तसेच निंबूत गावातील ग्रामस्थ व उद्योजक श्री. धैर्यशील रमेशराव काकडे इनामदार यांच्या सौजन्याने व निबूत ग्रामस्थांच्या वतीने पै अली रियाज सय्यद याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी त्याला चांदीची गदा, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. व निबुत ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
अली रियाज सय्यदच्या या यशामुळे निंबूत गावाच्या क्रीडा इतिहासात एक नवे सुवर्णपान लिहिले गेले असून, तो तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. भविष्यातही तो देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त केला जात आहे.

 यावेळी समस्त निंबूत ग्रामस्थांनी अली सय्यद चे कौतुक केले

Releated Posts

निंबूत गावच्या सौ. नंदा काकडे यांना लीनेस क्लब तर्फे आदर्श माता पुरस्कार प्रदान.

प्रतिनिधी. रविवार दिनांक १२/४/२०२६ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ बारामती येथे *माँ से बेटी सवाई* हा कार्यक्रम लीनेस क्लब…

ByBymnewsmarathi Apr 12, 2026

श्रीकांत ओव्हाळ सर यांच्या व्याख्यानाने करंजे ग्रामस्थ मंत्रमुग्ध.

प्रतिनिधी छत्रपती शिवाजीमहाराज, ङाॅ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले, आण्णाभाऊ साठे, तुकाराम महाराज आशा कोणत्याही संत महापुरूषांना जाती…

ByBymnewsmarathi Apr 12, 2026

श्री कन्हैय्या मित्र मंडळ, कसबा,बारामती आयोजित थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची 199 वी जयंती साजरी

प्रतिनिधी. :- सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री कन्हैय्या मित्र मंडळ, कसबा, बारामती आयोजित थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले…

ByBymnewsmarathi Apr 12, 2026

श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी…

महान समाज सुधारक, शिक्षण प्रेमी आणि स्त्री शिक्षणाचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले यांची 199 वी जयंती विद्यालयात उत्साहात…

ByBymnewsmarathi Apr 12, 2026