संपादक मधुकर बनसोडे.
दोन दिवसापूर्वी नींबूत येथील अण्णाभाऊ साठे नगर मध्ये एक 42 वर्षाचा तरुण दिवसभर त्याच परिसरामध्ये फिरत असल्याचे काळुराम सोनवणे यांच्या निदर्शनास आले सोनवणे यांनी त्या तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो तरुण भयभीत असल्याचे जाणवले. सोनवणे यांनी त्या तरुणाशी मैत्रीपूर्ण बोलणे सुरू केले त्याला दुपारचे जेवण दिले व त्याच्याशी गप्पा मारत असताना त्यांच्या लक्षात आले की हा तरुण थोडा मतिमंद आहे तात्काळ सोनवणे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित करंजे पूल पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला व त्या ठिकाणची सर्व हाकिकत त्यांना सांगितली तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे व पोलीस हवलदार अमोल भोसले दाखल झाले तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या मुलाने मी सोलापूरचा आहे असे सांगितले तात्काळ त्या मुलाची साबळे यांनी माहिती मिळवली व त्याच्या वडिलांशी संपर्क साधला वडिलांनी सांगितले की माझा मुलगा सुरेश थोडासा मतिमंद आहे फिरत भटकत तो तिकडे आला असावा आम्ही त्याचा शोध घेत आहोत साहेब माझ्या मुलाला तुमच्या जवळच ठेवा मी त्याला घेण्यासाठी येतो असे उदगार काढले तात्काळ अमोल भोसले व राहुल साबळे यांनी त्या मुलाला गाडीमध्ये बसवून करंजे पूल पोलीस चौकी या ठिकाणी नेले. प्रथम त्याला शांत करीत जेवण दिले तू घाबरू नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत तुझे घरचे तुला घ्यायला येत आहेत असं त्याच्याशी बोलून त्याला आत्मविश्वास दिला व त्याला शांत केले.
त्याचे वडील भीमण्णा अनमोलोलु त्याच दिवशी रात्री बारा ते साडेबारा या वेळामध्ये बारामती येथे आले त्यावेळेस पोलीस हवालदार अमोल भोसले स्वतः त्या मुलाला घेऊन बारामती येथे गेले सर्व खात्री केली व त्या मुलाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले.
हा सर्व प्रकार घडत असताना बारामती तालुक्यामध्ये पोटनिवडणूक होती त्या पोटनिवडणुकीच्या बंदोबस्ताचा ताण देखील पोलीस प्रशासनावरती होता त्यातूनही पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे व पोलीस हवालदार अमोल भोसले यांनी वेळ काढीत संबंधित मुलाला सुरक्षित व सुखरूप त्याच्या वडिलांच्या स्वाधीन बारामती एसटी स्टँड येथे केले. सुरेशला व्यवस्थित पाहिले आणि सुरेशच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. साहेब तुमच्या रूपाने मला देवच मिळाला तुमच्यामुळे माझा मुलगा मला सुखरूप मिळाला असे उद्गार काढीत सुरेशच्या वडिलांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले
या कार्याने परिसरातील नागरिकांनी देखील पोलीस प्रशासना बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.












