मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 6 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

आरशाला धक्का लागला अन् वाद जीवघेणा ठरला! दोन बसचालकांच्या मारहाणीत ट्रकचालकाचा मृत्यू; ‘खुनाचा पूर्वनियोजित हेतू नव्हता’, कोर्टाचे निरीक्षण

mnewsmarathi 06 Nov 2026 1 मिनिट वाचन 4,381 वाचन

प्रतिनिधी

कात्रज बोगद्याजवळ ट्रकचा आरशाला धक्का लागल्यावरून झालेल्या वादात ट्रकचालकाला बेदम मारहाण करून त्यांचा जीव घेणाऱ्या दोन ट्रॅव्हलर बसचालकांना न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांनी हा महत्त्वाचा निकाल दिला. आरोपींचा खून करण्याचा कोणताही पूर्वनियोजित बेत नव्हता, हे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांना खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरले.

अमोल मधुकर गाडेकर (वय 32, रा. वारणे, सातारा) आणि अस्लम इक्बाल मुल्ला (वय 23, रा. इचलकरंजी, कोल्हापूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

ही घटना 31 मे 2018 रोजी पहाटेच्या सुमारास कात्रज बोगद्याजवळील दरीपूल परिसरात घडली होती. लालजी पाल यांच्या ट्रकचा अचानक आरोपींच्या ट्रॅव्हलर बसच्या आरशाला स्पर्श झाला. या किरकोळ कारणावरून चिडलेल्या बसचालकांनी लालजी पाल यांना गाडीतून खाली खेचले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पाल यांचे डोकं रस्त्यावरील सिमेंटच्या ठोकळ्यावर आपटले. यात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी इब्राहिम सय्यद यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होन्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी बाजू मांडली. आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी एकूण 9 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी, घटनास्थळी आलेले पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली.

वाहनाचा आरशास धक्का लागणे ही मारहाणीचे समर्थन करणारी बाब असू शकत नाही. कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही आरोपींनी अत्यंत हिंसक मार्ग निवडला, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. अशा वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची गरज त्यांनी व्यक्त केली, ज्याची दखल घेत न्यायालयाने हा अंतिम निकाल दिला.ती.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi