• Home
  • ताज्या बातम्या
  • निरा – मोरगाव रस्त्यावर चौधरवाडी फाट्यावर भीषण अपघात; दोन बहिणींचा जागीच मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
Image

निरा – मोरगाव रस्त्यावर चौधरवाडी फाट्यावर भीषण अपघात; दोन बहिणींचा जागीच मृत्यू, भाऊ गंभीर जखमी

प्रतिनिधी.
निरा–मोरगाव राज्य मार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी साडेचार च्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला भाऊ गंभीर जखमी झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास चौधरवाडी फाट्याजवळ इलेक्ट्रिक स्कुटी आणि आयशर टेम्पो (क्र. DD-01-G-9343) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कुटीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर टेम्पोने स्कुटीला काही अंतर फरपटत नेले. या अपघातात अक्षदा ज्ञानेश्वर बोडरे (वय १७) व सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १५) (रा. मुरूम ता. फलटण जि. सातारा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय ९) हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताचे भीषण स्वरूप पाहून उपस्थित नागरिकांनाही धक्का बसला. काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वडगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संबंधित टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे सोमेश्वर आणि मुरूम परिसरावर शोककळा पसरली असून बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Releated Posts

परवानगीच्या गोंधळानंतर CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांची सशर्त मंजुरी

प्रतिनिधी दिल्लीतील जंतरमंतर येथे आज होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP च्या आंदोलनावरून देशभरात मोठी चर्चा रंगली आहे.…

ByBymnewsmarathi Jun 6, 2026

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन प्रेरणा आणि दिव्य आशीर्वादाने संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी…

ByBymnewsmarathi Jun 4, 2026

बारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन पुणे, दि. २९: “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ,…

ByBymnewsmarathi May 29, 2026

श्री क्षेत्र वीर येथे अभाविप बारामती आयोजित “सह्यादी स्पर्श” समर कॅम्प उत्साहात संपन्न

प्रतिनिधी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बारामती जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “सह्यादी स्पर्श” हा तीन दिवसीय समर…

ByBymnewsmarathi May 25, 2026