• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वर कारखान्याने सन २०२५-२६ गळीत हंगामतील खोडकी बील १००/- प्र.मे.टन व दुसरा हप्ता २००/- प्र.मे.टन असे एकुण ३००/-दूति मे.टन तात्काळ सभासदांच्या बैंक खात्यावर जमा करावे. :-श्री सतिश काकडे
Image

सोमेश्वर कारखान्याने सन २०२५-२६ गळीत हंगामतील खोडकी बील १००/- प्र.मे.टन व दुसरा हप्ता २००/- प्र.मे.टन असे एकुण ३००/-दूति मे.टन तात्काळ सभासदांच्या बैंक खात्यावर जमा करावे. :-श्री सतिश काकडे

प्रतिनिधी

सोमेश्वर कारखान्याने सन २०२५-२६ या गळीत हंगामात पहिली उचल ३३००/- प्र.मे.टन F.R.P सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केलेले आहेत. परंतु आत्ता कारखान्याचा गाळप हंगाम संपुण आत्ता आडीच महिने झाले त्यामुळे सोमेश्वर कारखान्याने सन २०२५-२६ गळीत हंगामतील खोडकी बील १००/- प्र.मे.टन व दुसरा हप्ता २००/- प्र.मे.टन असे एकुण ३००/- प्र.मे.टन तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर जमा करावे, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे. कारखान्याने चालु गळीत हंगामात १२,९८,५५९ मे. टन गाळप केले असुन १५,५५,६५०एवढी साखरपोती तयार झाली असुन रिकव्हरी ११.९९ आहे. तसेच मोठया प्रमाणात वीज विकी झालेली आहे. कारखान्याला सरासरी साखर विकी दर ३७३८ मिळालेला आहे.

माळेगाव कारखान्याने सन २०२५-२६ या गाळप हंगामाचे खोडकी बील २००/- प्र.मे.टन जाहिर केलेले आहे. माळेगाव कारखान्यापेक्षा सोमेश्वर कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. सोमेश्वर कारखान्यास उत्कृष्ठ कार्यक्षमता व इतर कारणांसाठी १० ते १२ पुरस्कार मिळालेले आहेत. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये सोमेश्वर कारखान्याने जादा उसाचे गाळप करून उच्चांकी क्रशिंग , चांगला साखर उतारा, उच्चांकी साखरपोती, जादाचे उपपदार्थ उत्पादन व विज निर्मितीमध्ये आग्रेसर असल्याने कारखान्याने मागील काही वर्षापासुन उच्चांकी अंतिम दर दिलेला आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने चेअरमन व संचालक मंडळाने सन २०२५-२६ चे खोडकी बील १००/- प्र.मे.टन व दुसरा हप्ता २००/- प्र.मे.टन असे एकुण ३००/- प्र.मे.टन तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर जमा करावे. कारण सभासदांना शेतीच्या मशागतीचे कामे, उसाच्या लागणी करणे, खते घेणे तसेच मुला-मुलींची अॅडमिशन घेणे यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने कारखान्याने सभासदांचा विचार करून दि.१२ जुन २०२६ पर्यंत खोडकी बील व दुसरे हप्ता सभासदंच्या बँक खात्यावर वर्ग करावा.

तरी सोमेश्वर कारखान्याने मागील काही वर्षापासुन हंगाम संपल्यानंतर देण्यात येणाऱ्या खोडकी बीलाची परंपरा बंद केलेली आहे. त्यामुळे शेतकरी कृती समितीस सन २०२५-२६ चे खोडकी बील १००/- प्र.मे.टन व दुसरा हप्ता २००/- प्र.मे.टन असे एकुण ३००/- प्र.मे.टन तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर जमा करावे अशी मागणी करावी लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे.

तरी चेअरमन व संचालक मंडळाने याबाबत तात्काळ निर्णय घेवुन दि.१२ जुन २०२६ पर्यंत सदर विकम सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी अन्यथा कृती समितीस मोर्चा काढावा लागेल याची नोंद घ्यावी व यावेळी काही अनुचीत प्रकार घडल्यास व कारखान्यास आर्थिक तोषिश लागल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांची राहिल.

Releated Posts

सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

प्रतिनिधी सोलापुरात संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.…

ByBymnewsmarathi Jul 19, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026