• Home
  • ताज्या बातम्या
  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत अभ्यासवर्गात ओंकार तावरे यांना नवी दायित्वे
Image

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत अभ्यासवर्गात ओंकार तावरे यांना नवी दायित्वे

प्रतिनिधी.

दि. ५, ते ८ जून २०२६ रोजी शिर्डी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पश्चिम महाराष्ट्र प्रांत अभ्यासवर्ग उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या अभ्यासवर्गामध्ये प्रांतातील विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी सहभाग घेत संघटनात्मक, वैचारिक व नेतृत्व विकासासंदर्भातील विविध सत्रांचा लाभ घेतला.

या अभ्यासवर्गादरम्यान संघटनात्मक दायित्वांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये बारामती जिल्ह्यातील कार्यकर्ते ओंकार विजय तावरे यांची बारामती जिल्हा संयोजक, प्रदेश सोशल मीडिया समिती सदस्य तसेच प्रदेश QRT सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली, तसेच

• इंदापूर तालुका संयोजक पदी उत्कर्ष बोडके.
• बारामती तालुका संयोजक पदी आदित्य गुळसुनकर.
• दौंड तालुका संयोजक पदी रुद्राक्ष लवटे यांची निवड करण्यात आली.

या नियुक्तीमुळे बारामती जिल्ह्यात विद्यार्थी परिषदेला अधिक बळ मिळणार असून विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल कार्यकर्ते, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Releated Posts

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक – अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

निंबुत ग्रामपंचायत साठी वार्डनुसार आरक्षण सोडत जाहीर. पहा कसे असेल आरक्षण

प्रतिनिधी. नींबूत ग्रामपंचायतचे आज सकाळी 10 वाजता जी झाले गणपती मंदिर येथे वार्डनुसार आरक्षण सोडत झाली. या आरक्षण…

ByBymnewsmarathi Jun 12, 2026

इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याचे पाणी पूर्ण क्षमतेने पोहोचविण्यासाठी जलसंपदा विभागाला तातडीच्या सूचना

सहसंपादक अक्षय थोरात इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खडकवासला कालव्याचे पाणी पूर्ण दाबाने व नियमित स्वरूपात उपलब्ध व्हावे, यासाठी भारतीय…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026

खांडज येथे बेंदचारी.चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

प्रतिनिधी अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026