• Home
  • माझा जिल्हा
  • खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती
Image

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार पार्थ पवार यांच्या प्रेरणेतून आणि एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कामासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात आली असून, विधिवत पूजन करून कामास प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये श्री. प्रताप जयसिंग आटोळे, श्री. सतीश फाळके, अॅड. रविंद्र माने, श्री. बन्सीलाल आटोळे, श्री. माऊली आटोळे, श्री. उत्तम फाळके, श्री. विलास (दादा) आटोळे, श्री. हनुमंत जरांडे, श्री. विक्रम आटोळे, श्री. अनिल सोरटे, श्री. किरण आटोळे, श्री. दत्ता जाधव, श्री. करण आटोळे, श्री. राहुल आटोळे व श्री. श्रीहरी सोरटे यांचा समावेश होता.

या प्रकल्पामुळे बेंदचारी चारीचे खोलीकरण पूर्ण झाल्यानंतर परिसरातील सिंचन व्यवस्था अधिक सक्षम होणार असून भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. तसेच पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेती उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल.

ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार पार्थ पवार यांचे आभार मानले.

एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती ही संस्था पर्यावरण संवर्धन व जलसंधारण क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, या उपक्रमामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Releated Posts

हरित भविष्यासाठी संत निरंकारी मिशनचे प्रेरणादायी पाऊल

प्रतिनिधी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त खंडाळा, लोणावळासह देशभरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान          …

ByBymnewsmarathi Jun 5, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे  बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी…

ByBymnewsmarathi May 16, 2026