Skip to main content

  • Home
  • ताज्या बातम्या
  • बारामती ! कृषी अधिकारी यांच्याकडून सदोबाचीवाडी येथे सोयाबीन पिक प्रशिक्षण व शेतकऱ्यांना मार्गदर्शन .
Image

बारामती ! कृषी अधिकारी यांच्याकडून सदोबाचीवाडी येथे सोयाबीन पिक प्रशिक्षण व शेतकऱ्यांना मार्गदर्शन .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

दिनांक २३ जून २०२६ रोजी सदोबाचीवाडी ता. बारामती येथे सोयाबीन पिक प्रशिक्षण राबविण्यात आले. सदर कार्यक्रमास आघारकर संस्थेचे शास्त्रज्ञ भानुदास ईधोळ यांनी सोयाबीन पिकाची पेरणी व किड रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. वाघमारे यांच्याकडून बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थित तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी कृषी विभागाच्या योजना, EL Nino चा प्रभाव, BBF ने पेरणी चे फायदे यावर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले त्यावर अधिकाऱ्यांनी त्याचे निवारण केले.

सदोबाचीवाडी हद्दीतील शेतकऱ्यांना आपली शेती करताना काही अडचण आल्यास शेतकरी आपली अडचण पहिली कृषी अधिकारी मिथुन बोराटे यांना हक्काने सांगतात व बोराटे हे आपल्या सहाय्याने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात आपली मदत व सहकार्य त्या शेतकऱ्याला कशी होईल याचा विचार करत असतात असे तेथील उपस्थित शेतकरी बांधवांकडून सांगण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक कृषी अधिकारी मिथुन बोराटे यांनी केले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी घोडके व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Releated Posts

रेगुलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे; पश्चिम बारामतीतील शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी सोमेश्वरनगर : पश्चिम बारामती भागातील शेतकऱ्यांची बैठक सोमेश्वरनगर येथे पार पडली. यावेळी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज  महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

कै. बाबालाल साहेबराव काकडे – देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

प्रतिनिधी. मुगुटराव साहेबराव काकडे महावि‌द्यालय, सोमेश्वरनगर मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026