Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी
Image

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी

मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन

निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन, अरेरावीची भाषा तसेच बस चालविताना नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकाराची चौकशी करून संबंधित चालकांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी पुणे जिल्हा मानव अधिकार संरक्षण समितीने बारामती आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, बारामती आगाराच्या निरा–बारामती मार्गावर कार्यरत असलेल्या काही स्थानिक चालकांकडून प्रवाशांशी वारंवार उद्धटपणे बोलणे, रस्त्यामध्ये विनाकारण बस थांबवून वाद घालणे तसेच प्रवाशांना त्रासदायक ठरेल अशा पद्धतीने बस चालविण्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः कोऱ्हाळे, निंबूत व सोमेश्वर परिसरातील काही प्रवाशांना अशा प्रकारच्या अनुभवांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रवाशांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही त्यांना कथितरीत्या ‘जे करायचे ते करा’ अशा प्रकारची उद्धट उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा ही सर्वसामान्य नागरिकांसाठी असून, एसटी महामंडळाच्या सेवा नियमांनुसार प्रवाशांशी नम्र, सभ्य व शिस्तबद्ध वर्तन करणे प्रत्येक चालकाचे कर्तव्य असल्याचे समितीने म्हटले आहे.

समितीच्या प्रमुख मागण्या

निरा–बारामती मार्गावरील संबंधित चालकांची चौकशी करून आवश्यकतेनुसार त्यांची इतर मार्गावर बदली करावी.

सकाळी ७ ते ११ या वेळेत निरा ते सोमेश्वर मार्गावरील प्रत्येक अधिकृत बसस्थानकावर प्रवासी असताना बस थांबविण्याची स्पष्ट सूचना सर्व चालकांना द्यावी.

प्रवाशांशी उद्धट वर्तन करणाऱ्या चालकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत अचानक तपासणी (Surprise Inspection) करण्यात यावी.

भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारींची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

निवेदनातील तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन १० ते १५ दिवसांच्या आत आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, अन्यथा प्रवाशांच्या वतीने शांततापूर्ण मात्र तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला आहे. प्रवाशांच्या तक्रारींबाबत संबंधित प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Releated Posts

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026