मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 11 August 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

रेगुलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे; पश्चिम बारामतीतील शेतकऱ्यांची मागणी

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 11, 2026 1 मिनिट वाचन 8,535 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर : पश्चिम बारामती भागातील शेतकऱ्यांची बैठक सोमेश्वरनगर येथे पार पडली. यावेळी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दोन लाख रुपये अनुदान अथवा प्रोत्साहनपर रक्कम देण्याची मागणी करण्यात आली.

युवा शेतकरी सुखदेवराव शिंदे यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने न्याय देऊन त्यांच्या योगदानाचा सन्मान करावा, अशी भूमिका मांडली. “वेळेवर कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देणे अन्यायकारक असून, किमान दोन लाख रुपयांचे अनुदान द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी सुनीलराजे भोसले, बारामती दूध संघाचे माजी चेअरमन पोपटतात्या भोसले, उत्तम आण्णा भोसले, प्रदीप भापकर, शिवाजी शेंडकर, संभाजी भापकर यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने शासनाकडे मागणी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख