बारामती ! वडगाव निंबाळकर येथील राजे उमाजी नाईक चौकात ड्रेनेजचा प्रश्न गंभीर; दुर्गंधीमुळे ग्रामस्थ त्रस्त, प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष!
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी – फिरोज भालदार
वडगाव निंबाळकर येथील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक चौक परिसरात फुटलेल्या ड्रेनेज (गटार) लाईनमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ड्रेनेजमधील सांडपाणी व दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून रस्त्यावर पडलेले बांधकामाचे अवशेष व उघडे ड्रेनेज वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस प्रवास करत असताना या ड्रेनेज मुळे वाहनचालकांचे अपघात झालेले आहेत असे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे . त्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत तरीही प्रशासन शांत का? असा सवाल आता ग्रामस्थांमध्ये पडला आहे.
राजे उमाजी नाईक चौक हा वडगाव निंबाळकर, मुढाळे, लोणी भापकर ,आणि सुपे या भागांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची वर्दळ चालू असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी ड्रेनेज (गटार) लाईन फुटल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र त्याठिकाणी दिसत आहे. हे ड्रेनेज मागील तीन / चार महिने झाले जसे आहे त्या अवस्थेत आहे मात्र या ड्रेनेजची दुरुस्ती ग्रामपंचायत प्रशासनाकडून का करण्यात येत नाही? असा सवाल आता ग्रामस्थांमध्ये उपस्थित झाला आहे.
फुटलेल्या ड्रेनेजमधून दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील दुकानदार व स्थानिक ग्रामस्थ हैराण झाले आहेत. संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत वारंवार माहिती देऊनही अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. दरम्यान ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करून सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा तसेच रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने आणखी विलंब न करता या समस्येची तातडीने दखल घ्यावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
