मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 15 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
खेळ

कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या मुलींचे वर्चस्व

mnewsmarathi 15 Oct 2026 1 मिनिट वाचन 4,389 वाचन

प्रतिनिधी

 

सोमेश्वर नगर येथील मु सा काकडे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या अंतर विभागीय कुस्ती स्पर्धा मंगळवार दिनांक 13 10 2026 रोजी पार पडल्या या स्पर्धेमध्ये पुणे शहर पुणे जिल्हा अहिल्यानगर व नाशिक या चार विभागातून दहा वजन गटांमध्ये 63 मुलींनी सहभाग नोंदविला या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पुणे जिल्ह्याला मिळाले व उपविजेतेपद अहिल्यानगर जिल्ह्याने मिळविले महाविद्यालयातर्फे प्रत्येक गटातील विजेत्या व उपविजेच्या खेळाडूंना प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सुवर्णपदक व रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले तसेच सर्वसाधारण विजेते आणि उपविजेते संघ यांना विशेष ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे तंव्यवस्थापन परिषद सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या शुभहस्ते झाले आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी उपस्थित खेळाडूंना सांगितले की. एक काळ असा होता की कुस्ती हा खेळ फक्त पुरुषांची मक्तेदारी मानला जायचा पण तुम्हाला आज या ठिकाणी कुस्ती खेळताना पाहून छाती अभिमानाने फुलून आली आहे. आपल्या देशातील महिला कुस्तीपटूंनी ऑलिंपिक आणि राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेमध्ये भारताचा तिरंगा उंचावला आहे मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या काकडे महाविद्यालयाच्या मॅटवर लढणाऱ्या या रणरागिनींमधून उद्याची साक्षी मलिक, विनेश फोगट तसेच नुकतीच जपान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेती अंतिम पंघाल यांचा वारसा चालवणारी जागतिक विजेती कुस्तीपटू तुमच्या मधूनच निर्माण होईल आणि हाच संघर्ष तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक संकटाशी लढायला शिकवेल या स्पर्धेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय पातळीवर सहभागी होणार आहे राष्ट्रीय पातळीवर तुम्ही जास्तीत जास्त पदके मिळवून विद्यापीठाचे नाव उंचवाल अशी मी अशा व्यक्त करून तुम्हा सर्वांना या स्पर्धेसाठी आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व उत्कृष्ट खेळाचेआणि खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन करण्याचे आव्हान केले याप्रसंगी विद्यापीठाचे अधिकारी श्री किशोर गडियार, उपप्राचार्य डॉ.जगन्नाथ साळवे , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. राहुल गोलांदे,श्री दत्ता उतेकर,डॉ. सुहास भैरट, सहसचिव डॉ.शितल शेंडकर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या डॉ. मनीषा पुंडे अहिल्यानगर विभागाचे सचिव डॉ. राजेंद्र देवकाते डॉ. संतोष भुजबळ हे उपस्थित होते. या स्पर्धा आंतरराष्ट्रीय पंच श्री मारुती सातव व त्यांचे सहकारी यांनी यशस्वीपणे कुठलीही तक्रार न होता पारदर्शकपणे पार पाडल्या संस्थेचे अध्यक्ष मा. सतीशराव काकडे- देशमुख यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, महाविद्यालयीन नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष सोमेश्वर कारखान्याचे संचालक श्री.अभिजीत काकडे- देशमुख यांनी खेळाडू, प्रशिक्षक, पंच यांना स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या संस्थेचे सचिव श्री.सतीश लकडे यांनी संपूर्ण स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे प्रा. दत्तराज जगताप एनसीसी विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्रीकांत घाडगे, आय .क्यू. ए. सी. प्रमुख डॉ.संजू जाधव , डॉ. निलेश आढाव, श्री मंगेश गायकवाड यांनी या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi