मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 16 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी सोलापूर जिल्ह्यातून जेरबंद

mnewsmarathi 16 Oct 2026 1 मिनिट वाचन 3,589 वाचन

प्रतिनिधी

वडगाव निंबाळकर : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या आरोपीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथून अटक केली. गणेश रामदास मदने (रा. कोहाळे खुर्द, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(m), ३५१(२), ३५१(३), ११५(२) तसेच पोक्सो कायद्यातील कलम ४, ५(l) व ६ अन्वये गुन्हा दाखल आहे.

फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच तिचे फोटो व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता.

फरार आरोपीचा शोध सुरू असताना तो सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी व पोलीस पथकाने केली. या पथकात सहायक फौजदार पन्हाळे, पोलीस हवालदार अनिल खेडकर, कल्याण खांडेकर, भागवत पाटील, सागर चौधरी, भाऊसाहेब मारकड, शशिकांत दळवी, अशोक शिंदे, संदीप गायकवाड तसेच पोलीस शिपाई आबा जाधव, नरेंद्र यादव, सूरज धोत्रे, सचिन घाडगे, सूरज पवार, नागनाथ परगे व विकास येटाळे यांचा समावेश होता.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी करीत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi