मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 2 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

सिग्नल यंत्रणेत बिघाड केला अन् मध्यरात्रीच्या अंधारात निर्जनस्थळी महालक्ष्मी एक्स्प्रेस लुटली, तीन महिलांचे दागिने लुटले

mnewsmarathi 02 Nov 2026 1 मिनिट वाचन 4,825 वाचन

प्रतिनिधी

मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत दरोडा घातल्याची घटना घडली आहे. जवळपास, पाच ते सहा महिला प्रवाशांचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड घडवून आणला. त्यानंतर रेल्वे थांबवण्यात आली. आरक्षित डब्यातील महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. यावेळी चोरट्यांनी एस-2, एस-3 आणि एस-4 डब्यांवर दगडफेकही केली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुनीता गोरक्षनाथ तुपे, यांनी मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहप्रवासी सुरेखा बाबासाहेब खाडे यांचेही दागिने चोरीला गेले आहेत. कोल्हापूर येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी प्रवास करणाऱ्या तीन महिलांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. इतकंच नव्हे तर, मध्यरात्रीचा अंधार आणि रेल्वे थांबलेली असताना अचानक दरोडेखोर आत घुसल्याने प्रवाशांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांच्या टोळीतील काही सदस्य सिग्नल यंत्रणेजवळ थांबले होते. तर काही जण रेल्वेतूनच प्रवास करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच, रेल्वे थांबवण्यासाठी सिग्नल यंत्रणेत बिघाड कसा करण्यात आला, याचा तपासही करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसंच, लूटमारीनंतर रेल्वेवर करण्यात आलेली दगडफेक हा गंभीर विषय आहे.

मिरज पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून रेल्वे पोलिसांचे पथक चोरट्यांचा माग काढण्यासाठी सातारा जिल्ह्यात रवाना झाले आहेत. या प्रकरणी मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi