मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Wednesday, 11 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

शिरूरमध्ये संतापजनक घटना ! ११ वर्षीय मुलीवर वडिलांकडूनच लैंगिक अत्याचार

mnewsmarathi 11 Nov 2026 1 मिनिट वाचन 4,586 वाचन

प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपीने अत्याचाराचे व्हिडिओ मोबाईलमध्ये जतन केल्याची माहितीही पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, मागील सुमारे एक वर्षापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी वडिलांनी मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या कृत्याचे व्हिडिओ मोबाईलमध्ये साठवून ठेवल्याचेही तक्रारीत नमूद आहेया प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मूळचा पश्चिम बंगाल येथील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

अल्पवयीन पीडितेची ओळख आणि वैयक्तिक माहिती कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे. या घटनेमुळे बालकांच्या सुरक्षिततेचा आणि कुटुंबातील मुलांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे..

लेखक

mnewsmarathi

M News Marathi