मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Wednesday, 11 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ पेक्षा खतरनाक घटना, स्कुटरवरून पाडलं अन् लाल्या येवलेला कोयत्याने तोडले

mnewsmarathi 11 Nov 2026 1 मिनिट वाचन 3,550 वाचन

प्रतिनिधी

राज्यभरात दिवाळी सणाचा उत्साह सुरू आहे. पाडव्यानंतर भाऊबिजेसाठी लगबग सुरू आहे. पण, दुसरीकडे ऐन सणासुधीच्या काळातही गुन्हेगारीच्या घटना काही केल्या थांबायचं नाव घेत नाही.पुण्यातील कोथरूड परिसरात एका सराईत गुन्हेगाराची भर रस्त्यावर निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदरा भागात पूर्ववैमनस्यातून एका 27 वर्षीय तरुणाची तलवार कोयते आणि लोखंडी हत्यारांनी वार करून हत्या करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार असलेल्या लाल्या येवलेची हत्या करण्यात आली आहेशनिवार 8 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दिवाळीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली. प्रकाश ऊर्फ लाल्या येवले असं मृत तरुणाचं नाव असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता.

पूर्ववैमनस्यातून तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्र आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला.प्रकाश येवले हा रात्री सुतारदरा परिसरातून मित्रांसोबत एका स्कुटरवरून जात होता. स्कुटरवर तिघे जण होते. त्यावेळी आरोपींनी तिघांनी पाठीमागून येऊन पकडलं आणि खाली पाडलं. यावेळी हल्लेखोरांनी लाल्या येवलेकडे असलेल्या कोयता हिसकावून घेतल्याचं दिसून येत आहे. याच कोयत्याने हल्लेखोरांनी त्याच्यावर सपासप वार केले. आरोपींनी त्याच्यावर वार केले आणि मारहाण केली.

 

या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. गस्तीवर असलेल्या कोथरूड पोलिसांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi