मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
सामाजिक

प्रजासत्ताक दिनी २५ वर्ष सुरक्षित सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४२ एसटी चालकांचा सत्कार

mnewsmarathi 26 Jan 2023 1 मिनिट वाचन 8,645 वाचन

प्रतिनिधी

एसटी महामंडळातर्फे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सेवेमध्ये सलग २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ विना अपघात सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील ४२ वाहन चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील इंदापूर आगारातील ५, तळेगाव १, नारायणगाव ३, भोर ५, पिंपरी २, शिरूर ४, शिवाजीनगर ३, दौड २, बारामती ४, सासवड ७, स्वारगेट ३, भोसरी प्रशिक्षण केंद्र १, विभागीय कार्यालय २ असे एकूण ४२ वाहन चालकांचा सत्कार करण्यात येणार आहेत.

 सत्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पितळी बिल्ला यासह पत्नीला साडी व रोख २५ हजाराचा धनादेश आहे, अशी माहिती असल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi