मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
सामाजिक

बारामती येथे जन्मेजयराज़े याच्या वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक विचाधारनेतुन विचारमंथन ,सुभेदार नरविर तानाजी मालुसरे यांचा पुण्यदिन आणि गड किल्ले उभारणी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा गौरव सन्मान सोहळा साजरा.

mnewsmarathi 06 Feb 2023 1 मिनिट वाचन 9,944 वाचन

प्रतिनिधी

बारामतीत दरवर्षी प्रमाणे आपल्या व मुलाचा वाढदिवस संस्कारक्षम विचाधारेतुन करणेचा ऊपक्रम या वर्षीही प्रदिप ढुके परिवारांनी साजरा केला.

या वर्षी ऐतिहासिक विचाधारेतुन वाढदिवस साजरा केला गेला. बारामती येथिल जेष्ठ नागरिक संघ हाॅल येथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतिहास संशोधक, थोर अभ्यासक ,व्याख्याते पत्रकार श्री दत्ताजी नलावडे, श्री रोहित नलावडे, श्री दत्ताजी महाले सपकाळ ( शूर शिवरक्षक जिवाजी महाले यांचे 11 वे वंशज ),बारामती नगरपरिषदेचे सिईओ श्री महेश रोकडे साहेब ,सौ अर्चना सातव अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ बारामती,सौ अर्चना ढुके ,मंगल बोरावके,ज्योतीताई जाधव, श्री माधव जोशी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ बारामती ,श्री प्रभाकर बनकर,श्री चारुदत्त काळे, श्री अनिल सावळे पाटील , श्री अमोल यादव, श्री बगाडे,श्री गोकुळ टंकसाळे ,श्री योगेश नालंदे ,श्री मधुकर बनसोडे,श्री नाळे साहेब,श्री शेखर जाधव, श्री प्रकाश सातव ,श्री राम गवळी,श्री नितीन मांडगे,श्री मिनिनाथ मोरे,श्री आबासाहेब सूर्यवंशी,राजे ग्रुप सदस्य धीरज पवार, श्री रमेश मरळ देशमुख श्री दत्तात्रय हरिहर ऊपस्थित होते.

या वेळी प्रदिप ढुके यांचा मुलगा जन्मेजयराजे याच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांचे थोर विचार ऐकणेस मिळाले.

या प्रसंगी विविध क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलेल्या मुला मुलींचा यथोचित गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 दर वर्षी सामाजिक बांधिलकी जपत ढुके परिवार करत असलेल्या वाढदिवसानिमित्त सर्वानी कौतुक केले.सौ अर्चना ताई सातव,श्री माधव जोशी सर,श्री महेश रोकडे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले आणि संस्कार,प्रेरणा त्याबरोबरच गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्या पाहिजेत आणि सर्वानी सहभागी झाले पाहिजे असे आव्हान करण्यात आले.

या निमित्ताने इतिहास कालीन गड किल्ले जतन आणि संवर्धन मोहीमेत सर्वानी एकत्र येऊन कार्य सिद्धीस नेण्याचे आव्हान प्रदिप ढुके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापन सल्लागार श्री पतकी अश्विनीकुमार यांनी केले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi