• Home
  • माझा जिल्हा
  • सप्टेंबर महिन्यात आधारचा वापर करून झाले 25.25 कोटी ई-केवायसी व्यवहार; महिन्याभरात झाले 175 कोटींहून अधिक प्रमाणीकरण
Image

सप्टेंबर महिन्यात आधारचा वापर करून झाले 25.25 कोटी ई-केवायसी व्यवहार; महिन्याभरात झाले 175 कोटींहून अधिक प्रमाणीकरण

प्रतिनिधी

महिन्याभरात झाले 21 कोटीहून अधिक आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम व्यवहारयुआयडीएआयने सप्टेंबर महिन्यात नागरिकांच्या 1.62 कोटी आधार अपडेट विनंत्या यशस्वीरित्या केल्या पूर्ण नागरिकांकडून आधारचा अवलंब आणि वापर सातत्याने वाढत असून राहणीमान सुलभतेसाठी आधार उपयुक्त ठरत असल्याचे यावरून दिसून येते. केवळ सप्टेंबर महिन्यात आधारद्वारे 25.25 कोटी ई-केवायसी व्यवहार करण्यात आले आहेत. ऑगस्टच्या तुलनेत या प्रकारच्या व्यवहारांमध्ये सुमारे 7.7% वाढ झाली आहे.

केवळ आधार धारकाच्या स्पष्ट संमतीने ई-केवायसी व्यवहार केला जातो, सोबतच केवायसीसाठी प्रत्यक्ष कागदपत्रे आणि वैयक्तिक पडताळणीची आवश्यकता राहत नाही.आधार ई-केवायसी सेवा बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय सेवांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सोबतच उत्तम आणि पारदर्शक ग्राहक सेवा प्रदान करत व्यवसाय करणे सुलभ बनवत आहे.आत्तापर्यंत आधारद्वारे झालेल्या ई-केवायसी व्यवहारांची एकत्रित संख्या सप्टेंबर 2022 अखेर 1297.93 कोटी वर पोचली आहे.त्याचप्रमाणे, आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम (AEPS) ही पद्धत उत्पन्नाच्या पिरॅमिडच्या तळाला आर्थिक समावेशन सक्षम करणारी आहे.आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम आणि मायक्रो एटीएमच्या नेटवर्कद्वारे सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत एकत्रितरित्या, 1549.84 कोटी लास्ट माईल बँकिंग व्यवहार शक्य झाले आहेत.

केवळ सप्टेंबर महिन्यात, संपूर्ण भारतात 21.03 कोटी आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टमद्वारे व्यवहार करण्यात आले.सप्टेंबर महिन्यात आधारद्वारे 175.41 कोटी प्रमाणीत व्यवहार केले गेले. यापैकी सर्वाधिक मासिक व्यवहार फिंगरप्रिंट बायोमेट्रिक प्रमाणीकरण, त्या खालोखाल लोकसंख्याशास्त्रीय प्रमाणीकरण आणि ओटीटी प्रमाणीकरण वापरून केले गेले.आत्तापर्यंत, सप्टेंबरच्या अखेरीस एकत्रितरित्या 8250.36 कोटी प्रमाणीकरण व्यवहार पूर्ण झाले आहेत.

आधारच्या प्रामाणिकतेचे दर्शक आहे.भारतातील प्रौढ लोकसंख्येमध्ये आधारची संपृक्तता आली आहे. सप्टेंबर अखेरीस सर्व वयोगटांमध्ये आधारची संपृक्तता 93.92% होती.सप्टेंबर महिन्यात नागरिकांनी 1.62 कोटी पेक्षा जास्त आधार यशस्वीरित्या अपडेट केले, ऑगस्ट महिन्यात 1.46 कोटी आधार अपडेट करण्यात आले होते.एकत्रितपणे, आजपर्यंत (सप्टेंबरच्या अखेरीस) रहिवाशांच्या विनंतीनुसार 66.63 कोटी आधार क्रमांक यशस्वीरित्या अपडेट केले गेले आहेत.या अद्ययावतीकरण विनंत्या लोकसंख्याशास्त्रीय तसेच बायोमेट्रिक अद्यतनांशी संबंधित असून दोन्ही प्रकारे प्रत्यक्ष आधार केंद्रांला भेट देऊन आणि ऑनलाइन आधार प्लॅटफॉर्म वापरून केलेल्या आहेत.

शेवटच्या माणसापर्यंत आधार सेवा पोहचवण्यासाठी आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम असो, ई-केवायसी असो, आधार सक्षम डीबीटी असो किंवा प्रमाणीकरण असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या मोहीमेला पाठिंबा देण्यात आधार उत्कृष्ट भूमिका बजावत आहे.आधार ही सुशासनाची डिजिटल पायाभूत सुविधा, राहणीमानात सुलभता आणि व्यवसाय करण्याची सुलभता या दोन्हीसाठी एक उत्कृष्ट सुविधा आहे. डिजिटल ओळखपत्र केंद्र राज्यांमधील विविध मंत्रालये आणि विभागांना कार्यक्षमता, पारदर्शकता आणि लक्ष्यित लाभार्थींना कल्याणकारी सेवा प्रदान करण्यात मदत करत आहे.आतापर्यंत, केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांद्वारे चालवल्या जाणार्‍या देशातील सुमारे 1000 कल्याणकारी योजना आधार वापरासाठी अधिसूचित करण्यात आल्या आहेत.

Releated Posts

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध घेण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश.

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 BNS 137(2) मधील मुले 1) शुभम गणेश जाधव वय…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रतिनिधी पुणे, दि.२०: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीकरिता २ आणि २० डिसेंबर…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

सोमेश्वर’चे अनुदान धोरण फसवे; सभासदांची दिशाभूल थांबवा – शेतकरी कृती समितीचा कारखाना प्रशासनावर हल्लाबोल

​प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अलीकडेच जाहीर केलेले उसाचे अनुदान धोरण हे पूर्णपणे फसवे असून याद्वारे ऊस…

ByBymnewsmarathi Dec 16, 2025