रत्नदीप पब्लिक स्कूल, सावळज मार्फत कॅट परीक्षाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमाचे परिसरातून कौतुक.

माझा जिल्हा

प्रतिनिधि

 सावळज येथे कॉम्पिटिटिव्ह अँप टेस्ट (CAT) परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेला सावळज परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रथमच एलकेजी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे बालाजी मस्के यांच्या हस्ते व थोरवत सर तसेच प्रज्ञा जाधव मॅडम यांच्या हस्ते ट्रॉफी व सर्टिफिकेट रँक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. परीक्षेची माहिती व स्वरूप स्कूलचे चेअरमन श्री प्रवीण गोडबोले सर यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी ही परीक्षा उपयुक्त ठरत आहे. लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पालकांना तसेच विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी शाळेकडून परीक्षेचे नियोजन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली अंतर्गत शिक्षकांचे ही कौशल्य गुण आणि विद्यार्थ्यांप्रती आत्मीयता आवर्जून लक्षात येते. आर्य अभ्यास अकॅडमी मार्फत सुप्रिया आवळे यांनी अभ्यास ची माहिती दिली.

पाहुण्यांचे स्वागत रत्नदीप पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल वृषाली धेंडे यांनी केली. उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल परिसरातून शाळेचे कौतुक होत आहे .तसेच या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नदीप पब्लिक स्कूल कडून सर्वांचे मनःपूर्वक आभार.