प्रतिनिधी
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम आदींसह खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची मार्च २०२३ अखेरची सांख्यिकी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर ३० एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहितीचा नमुना ईआर-१ प्रत्येक तिमाहीस सादर करणे आवश्यक आहे. मार्च २०२३ अखेर संपणाऱ्या तिमाहीचा नमुना ईआर-१ संकलनाचे काम सुरू आहे. त्याला सर्व आस्थापनांनी प्रतिसाद देत माहिती भरावी यासाठी आस्थापनांना यापूर्वी दिलेल्या युझर नेम व पासवर्डचा वापर करून प्रत्येकाने www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करावे आणि आपली अचूक माहिती ऑनलाईन पद्धतीने मुदतीत सादर करावी.
प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावा. यासंबंधी माहिती अथवा मदत आवश्यक असल्यास punerojgar@gmail.com किंवा asstdiremp.pune@ese.maharashtra.gov.in या ईमेल पत्यावर संपर्क साधावा, असे प्र.सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी कळविले आहे.