मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 21 April 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

बारामती ! वडगाव निंबाळकर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन .

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
April 21, 2023 1 मिनिट वाचन 8,519 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

वडगाव निं प्रतिनिधी- फिरोज भालदार

आता सध्या रमजानचा महिना चालू आहे . मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना म्हणजे रमजान महिना हा ओळखला जातो . यामध्ये मुस्लिम बांधव हे महिनाभर उपवास ठेवत असतात .हा उपवास ठेवण्याचा वेळ सकाळी साडेचार च्या आत मध्ये जेवायचे व ते दिवसभर न पाणी पिता न जेवता उपाशी राहणे व संध्याकाळी सात वाजता आपला हा उपवास सोडणे याप्रकारे त्यांचे नियमित वेळापत्रक महिनाभर चालू असते.

याचेच औचिध्य साधून वडगाव निंबाळकर जामा मज्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये राजेश्वरराजे राजेनिंबाळकर व आध्यक्ष नागेश जाधव यांची इफ्तार पार्टी १५ एप्रिल रोजी , व वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतचे सरपंच सुनील ढोले यांची इफ्तार पार्टी दि.१९ एप्रिल रोजी , याप्रमाणेच , पै.नानासाहेब मदने व मित्रपरिवार यांची इफ्तार पार्टीचे आयोजन २० एप्रिल रोजी यांच्याकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .

यामध्ये वडगाव निं. चे सरपंच सुनील ढोले, राजेश्वर राजेनिंबाळकर व नागेश जाधव , पै .नानासाहेब मदने व मित्रपरिवार यांनी सर्वांनी मुस्लिम बांधवांसमवेत रोजा सोडला व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या व रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या . व वडगाव निंबाळकर मुस्लिम जमात कमिटीने सर्वांचे आभार मानून गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आले . व असेच सर्वांनी घोळ्यामेळ्यात येऊन सर्वांनी सर्व सनोउत्सव अशेच आनंदानी साजरी करत चला असे मुस्लिम बांधव व मान्यवरांकडून संबोधण्यात आले . यावेळी वडगाव निंबाळकर सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते

.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख