मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
सामाजिक

संत निरंकारी मिशनद्वारा बाल संत समारोहाचे आयोजन…

mnewsmarathi 26 May 2023 1 मिनिट वाचन 9,916 वाचन

भोसरी :प्रतिनिधी.
सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील संत निरंकारी सत्संग भवन भोसरी येथे रविवार दि. २८ मे २०२३ रोजी पुणे झोन चा बाल समागम सकाळी ११ ते २ या वेळेत संपन्न होणार आहे.या बाल समागम ला पुणे झोन मधून १५०० हुन अधिक लहान बालक उपस्थित राहणार आहेत.


आज संत निरंकारी मिशन लहान मुलांना आध्यात्मिकतेचे धडे देऊन त्यांना नैतिकता, मानवी गुण शिकवून समाजासाठी एक सुजाण नागरिक बनवण्याचे कार्य करीत आहे. सुसंस्कारित मुले उत्तम समाज निर्माण करू शकतात त्यासाठी मुलांचा बौद्धिक,मानसिक,आध्यात्मिक विकास होणे गरजेचे आहे. मुलांना शिक्षणाबरोबर चांगल्या संस्काराची गरज आहे, हे संस्कार केवळ संतांच्या सानिध्यात मिळत असतात म्हणून निरंकारी सत्संगच्या माध्यमातून असे विशाल बाल संत समागम आयोजित केले जातात.
या बाल समारोहामध्ये लहान-लहान मुल अवतारवाणी गायन, हरदेव वाणी गायन, कवी दरबार, नाटिका,गीत, विचार यां द्वारे सदगुरु चा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवून आशीर्वाद प्राप्त करतील. या सत्संग सोहळ्याला संत निरंकारी मंडळाच्या वतीने अम्रितपाल सिंह (गुजरात) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते उपस्थित बालकांना मार्गदर्शन करतील अशी माहिती ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रमुख) यांनी दिली आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi