संपादक मधुकर बनसोडे.
महाराष्ट्रामध्ये अवैद्य दारू, गुटखा, मटका, जुगार. या वरती बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात हे धंदे राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे या अवैद्य धंद्यामुळे महाराष्ट्रातील तरुण व्यसनाधीन होऊन नैराश्याकडे वाटचाल करीत आहे व त्यातूनच आत्महत्या करत आहेत?
अवैद्य धंदे बंद करण्याचा निर्णय हा फक्त कागदावरतीच राहिला? लहान वयातच महाराष्ट्रातील तरुणाला व्यसनाचा नाद लागला राज्य सरकारने हे निर्णय जरी घेतले असले तरी त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत यांनी आपल्या हद्दीमध्ये अवैध धंदे होणार नाहीत याची खबरदारी जर घेतली तर नक्कीच महाराष्ट्रातील तरुणांचे जीवन बरबाद होण्यापासून वाचू शकते.
तसं पाहिलं तर अवैद्य धंदे बंद करणे ही खूप सोपी गोष्ट आहे मात्र याकरता एका गावाने निर्णय न घेता अख्या तालुक्याने अख्या जिल्ह्याने आपल्या ग्रामसभेमध्ये दारू, मटका, जुगार, गुटखा, बंदीचे निर्णय घेऊन अशा अवैध धंदा करणाऱ्या लोकांना पाठीशी न घालता यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
ग्रामपंचायत प्रशासन, नगरपालिका प्रशासन, महापालिका प्रशासन यांनी केली पाहिजे.
तरच देशाचं भवितव्य बरबाद होण्यापासून वाचू शकेल.
फक्त पोलीस प्रशासनावरतीच अवलंबून न राहता देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण देखील देशासाठी काहीतरी देणं लागतो याचं प्रत्येकाने भान ठेवून असे निर्णय घेण्यासाठी संबंधित गावातील प्रशासनास भाग पाडले पाहिजे..
कदाचित यामुळे तरी व्यसनाधीन होऊन नैराश्याकडे वाटचाल करीत असलेला तरुण व त्या तरुणाचं कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचेल.