ॲथलिटला प्रतिबंधित स्टिरॉइडचे इंजेक्शन देणाऱ्या प्रशिक्षकावर नाडा या राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने घातली चार वर्षांची बंदी

Uncategorized

प्रतिनिधी

डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबईस्थित अॅथलेटिक्स प्रशिक्षक मिकी मेंझेस यांच्यावर राष्ट्रीय अँटी-डोपिंग शिस्तपालन समितीने (एडीडीपी) नुकतीच चार वर्षांची बंदी घातली आणि त्यांना ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला. त्याने दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगत असलेली त्याची प्रशिक्षणार्थी कीर्ती भोईटे हिला ड्रोस्टॅनोलोन या प्रतिबंधित पदार्थाचे इंजेक्शन दिले होते.2020 मध्ये, कीर्ती भोईटेची अॅनाबॉलिक-अँड्रोजेनिक स्टिरॉइड, ड्रोस्टॅनोलोनसाठीची (प्रतिबंधित पदार्थांच्या जागतिक डोपिंग विरोधी एजन्सीच्या यादीत याचा समावेश आहे.) चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली. तिला एडीडीपीने 29 जून 2021 रोजी चार वर्षांसाठी अपात्र ठरवले. तिने अपील दाखल केले आणि या वर्षी 18 एप्रिल रोजी डोपिंग विरोधी अपील पॅनेल (एडीएपी) ने तिची बंदी दोन वर्षांपर्यंत कमी केली.एडीएपी च्या सुनावणीदरम्यान, कीर्तीने निदर्शनास आणले की तिच्या प्रशिक्षकाने तिला आणि आणखी एका ॲथलीटला सप्लिमेंट्स व्यतिरिक्त हे इंजेक्शन दिले होते.

तिच्या तक्रारीवरून महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनने प्रशिक्षकाची चौकशी करून त्याच्यावर चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचेही तिने उघड केले.या माहितीनुसार कारवाई करत, नाडा ने यावर्षी 12 मे रोजी प्रशिक्षक मिकी मिनेझिस यांच्यावर डोपिंग विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला. अॅथलीटला दिलेले इंजेक्शन प्रतिबंधित पदार्थापासून मुक्त आहे असे पुरवठादाराने आपल्याला सांगून आपली दिशाभूल केली असे म्हणत प्रशिक्षकाने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.30 सप्टेंबर रोजी, एका एडीएपी ने प्रशिक्षकाला कीर्ती भोईटेला इंजेक्शनद्वारे स्टिरॉइड दिल्याबद्दल आणि तिच्या कामगिरीचा अवाजवी फायदा मिळवण्यासाठी डोपिंगमध्ये त्याच्या सहभागाबद्दल दोषी धरले.

डोपिंगविरोधी नियमांचे संभाव्य उल्लंघन नोंदवण्यासाठी नाडा प्रोत्साहित करते. डोपिंगविरोधी नियमांच्या विरोधात जाऊ शकणार्‍या कृतींची तक्रार करण्यासाठी वेबसाइटवर एक सुरक्षित लिंक आहे नाडाशी शेअर केलेली प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे गोपनीय राहते. संभाव्य उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी ही लिंक आहे: