मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाची वाशिम मध्ये जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती

mnewsmarathi 12 Jul 2023 1 मिनिट वाचन 8,898 वाचन

प्रतिनिधि

                           वाशिम, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती अभियान व समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी विधी स्वयंसेवक शाहीर उत्तम इंगोले यांनी मनोरंजनात्मक शैलीतुन लोक जनजागृतीपर गाणी सादर करुन उपस्थितांचे प्रबोधन केले.

तसेच लोकसंख्या वाढीचे वर्तमान व भविष्यातील दुष्परिणामांबाबत लोकांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांना सुनिता रणवीर,सुनिल लबडे व सचिन भालेराव यांनी सहकार्य केले.जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक व इतर नागरीकांना विधी स्वयंसेवक सुशिल भिमजियाणी, मोतिराम खडसे, मनिषा दाभाडे, उषा वानखेडे व शितल बनसोड यांनी कायदेविषयक जनजागृतीपर हस्तपत्रके वाटुन कायद्याबाबत माहिती दिली. शंकर पाटील खंडारे

लेखक

mnewsmarathi

M News Marathi