• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती विधानसभा मतदार संघात मतदार यादी पडताळणी कार्यक्रम सुरू
Image

बारामती विधानसभा मतदार संघात मतदार यादी पडताळणी कार्यक्रम सुरू

प्रतिनिधी

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत २०१ बारामती विधानसभा मतदार संघामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी २१ ऑगस्टपर्यंत घरोघरी भेट देऊन मतदार याद्यांची पडताळणी करणार आहेत, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार ही कार्यवाही सुरू आहे. या मध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारकार्डला आधार लिंक करणे, ८० वर्षावरील मतदारांची पडताळणी करणे, मतदार ओळखपत्रावरील छायाचित्राची पडताळणी करणे, १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवकांचे मतदार यादीत नाव नोंदणी करणे. मयत मतदाराचे नाव यादीतून कमी करणे आदी कामे करणार आहेत.

या पडताळणीमुळे मतदार यादीचे शुद्धीकरण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय सहायकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहाय्य करावे. तसेच मतदार संघातील नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. नावडकर यांनी केले आहे.

Releated Posts

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026